मुंबईत आढळला झिकाचा पहिला रुग्ण, काय आहेत आजाराची लक्षणं?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबईमध्ये झिका या आजाराच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली आहे. चेंबूर येथे राहणाऱ्या ७९ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाला मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, थॅलेसेमिया मायनर हे आजार होते.

तसेच २० वर्षापूर्वी त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. पुणे येथील नॅशनल व्हायरल इन्स्टिट्यूट यांनी या रुग्णाला झिका आजार असल्याचे कळवले आहे.

या रुग्णाला १९ जुलैपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे होती. तसेच त्यांनी त्यासाठी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडून उपचार घेतले होते.

२ ऑगस्ट रोजी रुग्ण बरा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. झिका हा आजार विषाणूमुळे होणारा सौम्य आजार असून संक्रमित एडिस डासांमुळे त्याचा प्रादुर्भाव होतो.

एडिस डास डेंग्यू आणि चिकुनगुनिया या आजारांचाही प्रसार करतात. हा आजार विषाणूसारखा असला तरीही करोनासारखा वेगाने पसरत नाही, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

लक्षणे काय आहेत? 

ताप, त्वचेवर पुरळ, डोळे येणे, स्नायू आणि सांधेदुखी, अस्वस्थता आणि डोकेदुखी.

झिका विषाणूमुळे होणारा हा आजार एक स्वयंमर्यादित आजार आहे. या विषाणूची लागण झालेल्या ८० टक्के व्यक्तींमध्ये ही लक्षणे नसतात.

पालिकेमध्ये या आजाराच्या चाचणीची सुविधा केईएम रुग्णालयामध्ये उपलब्ध आहे.

आरोग्य विभागाने घेतलेली खबरदारी

बाधित रुग्णाच्या परिसरातील घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यात नवीन संशयित रुग्ण आढळला नाही.

इमारतीच्या पार्किंगमध्ये आढळणारी एडीस ब्रीडिंग आणि डास नियंत्रण उपाययोजना केल्या जातात.


हेही वाचा

गेल्या 7 दिवसांत गॅस्ट्रो, डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये 50% वाढ

[ad_2]

Related posts