मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी CSMT रेल्वे स्टेशनवर अत्याधुनिक जिम

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी अलीकडेच मुंबई विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हाय-टेक फिटनेस सेंटरचे (जिम) उद्घाटन केले. फिटनेस सेंटर (जिम) अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे.

हाय-टेक फिटनेस सेंटर रेल्वे अधिकाऱ्यांना त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास सक्षम करेल. याशिवाय टेबल टेनिस आणि कॅरमसारखे इतर गेम देखील इथे आहेत. 

अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आणि अनुभवी फिटनेस प्रशिक्षकांच्या नेतृत्वाखाली हे केंद्र चालवले जाईल. याचा फायदा नक्कीच रेल्वे अधिकाऱ्यांना होईल. रेल्वेच्या तणावपूर्ण आणि चोवीस तास काम काजासाठी कर्मचार्‍यांची फिटनेस पातळी चांगली असणे आवश्यक आहे. पण फिटनेस सेंटर रेल्वे अधिकाऱ्यांच्या आरोग्याच्या दिशेने एक पाऊल आहे.

दररोज दोन तासांपेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या मुंबई विभागातील कर्मचाऱ्यांना शारीरिक व्यायामासाठी पुरेसा वेळ मिळत नाही, त्यांना या उपक्रमाचा सर्वाधिक फायदा होणार आहे.

या केंद्राचे उद्घाटन 22 ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेचे मुख्यालय आणि मुंबई विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. रजनीश गोयल, DRM मुंबई विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम विकसित करण्यात आला आहे.


हेही वाचा

मुंबई-अलिबाग रो-रो सर्विस 25 ऑगस्टसाठी बंद

बोरिवली मेट्रो स्टेशनजवळ पार्क केलेल्या रिक्षावर काचेचे पॅनल पडले

[ad_2]

Related posts