Pune Crime News Seized Drugs Worth 50 Crores By DRI In Pune

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : शिक्षणाचं माहेरघर सध्या ड्रग्जच्या विळख्यात सापडल्याचं (Pune Crime News)  दिसत आहे. मागील काही महिन्यांपासून ड्रग्ज पुरवण्याऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. त्यांनी धडाधड कारवायादेखील सुरु केल्या आहेत. त्यातच पुणे परिसरातून तब्बल 50 कोटी रुपयांचा 101 किलो मेथाक्युलोन हा अमली पदार्थ जप्त करण्यात  आला आहे. त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. 

याप्रकरणी तेलंगणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि हरियाणा येथील रहिवासी असलेल्या 5 जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई महसूल गुप्तचर यंत्रणेच्या पथकाने केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डीआरआयच्या अधिकाऱ्यांना एका कारमध्ये पाच जण मेथाक्युलोनसह पुण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी सापळा रचून एक वाहन जप्त केलं आहे. वाहनात पांढरे स्फटिकाचे साहित्य असलेले 4 निळ्या रंगाचे प्लास्टिकचे ड्रम आढळून आले आहेत. यामध्ये मेथाक्युलोन हा पदार्थ आढळला असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर पोलिसांनी लागलीच पाच जणांना अटक केली आहे. आरोपी  बेकायदा विक्री, खरेदी, वाहतूक आणि निर्यातीत गुंतलेले असल्याचंदेखील समोर आलं आहे. 

शिक्षणाचं माहेरघर सध्या ड्रग्जच्या विळख्यात?

दोन दिवसांपूर्वीच पुण्यातून  1 कोटी रुपयाचे अफीम जप्त करण्यात आलं होतं. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक एकने 3 जणांना अटक केली होती. राजस्थानची टोळी अफीमचा साठा गोळा करत होती, असं तपासात समोर आलं होतं. 

सुमेर जयरामजी बिष्णोई, चावंडसिंग मानसिंग राजपूत, लोकेंद्रसिंह महेंद्रसिंग राजपूत असे अटक केलेल्या आरोपींची नावे होती. पुण्यातील गोकुळनगर भागात पोलिसांनी कारवाई केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी कात्रज भागात पेट्रोलिंग करत असताना माहिती मिळाली की, कात्रज-कोंढवा रोडवर एक व्यक्ती अफिम या अंमली पदार्थाची विक्री करत होते. पोलिसांनी छापा टाकून सुमेर बिष्णोई याला ताब्यात घेतलं होतं. त्याच्याकडून 64 लाख 28 हजार रुपये किमतीचे 3 किलो 214 ग्रॅम अफिम जप्त केलं होतं. अधिक चौकशी केली असता त्याने अफिम हे त्याच्या दोन साथीदार चावंडसिंग राजपूत आणि लोकेंद्रसिंह राजपूत यांच्याकडून आणल्याचे सांगितले होतं. तसेच त्यांनी अंमली पदार्थाचा साठा करुन ठेवल्याचं सांगितल होतं. त्यानुसार आरोपींकडून 1 कोटी रुपयाचे अमली पदार्थ जप्त केले आहे. त्यामुळे पुणे शहरात नेमकं चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Ajit Pawar Baramati Visit : पोलीस ठाण्यात कुणालाच यायची गरज पडू नये, आदरयुक्त दबदबा असला पाहिजे; अजित पवारांच्या पोलिसांना सूचना

[ad_2]

Related posts