[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई : तलाठी भरती परीक्षेचा पेपर फुटीचा (Talathi Exam 2023) आरोप असलेला मुख्य आरोपी गणेश गुसिंगे हा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडून घेण्यात आलेल्या भरती परीक्षेत पास झाल्याचं दिसून येतंय. या भरतीच्या परीक्षेमध्ये गणेश गुसिंगेला 138 गुण प्राप्त झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचं दिसून येतंय. या सर्व प्रकारानंतर आता या परीक्षांच्या आयोजनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय.
नाशिकमध्ये तलाठी भरतीचा पेपर फोडणाऱ्या गणेश गुसींगेला वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडून घेण्यात आलेल्या भरती परीक्षेच्या जाहीर झालेल्या यादीत 138 गुण मिळाल्याचं दिसून आलं. त्यामुळे त्याची निवड होऊ शकते. गणेश गुसिंगे हाच पिंपरी चिंचवड पोलिस भरती आणि म्हाडाच्या पेपरफुटीमध्येही आरोपी आहे.
नाशिकमध्ये तलाठी भरतीचा पेपर फोडणाऱ्या गणेश गुसींगेला काल जाहीर झालेल्या #DMER परीक्षेत १३८ गुण आहेत, कदाचित त्याची निवड सुध्दा होऊ शकते.
हाच गुसींगे म्हाडा पेपरफुटीमधे आरोपी आहे आणि पिंपरी चिंचवड पोलीस भरतीमधे फरार आरोपी आहे.
अशी आपली परीक्षा व्यवस्था आणि पेपरफुटी कायदे आहेत. pic.twitter.com/QgsbVqygIG
— स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य (@Mpsc_Andolan) August 26, 2023
[ad_2]