Watch PM Modi Asks His Doctors To Check On Person Who Collapsed During His Address In Delhi Ahead Of G20 Summit

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) दिल्लीतील (Delhi) एका कार्यक्रमात संबोधित करत असताना त्यांच्या समोर एका व्यक्तीला भोवळ (Person Collapsed) आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी क्षणाचाही विलंब न करता, लगेचच त्यांच्या वैयक्तिक डॉक्टरांच्या टीमला संबंधित व्यक्तीला तपासण्यास आणि त्याकडे लक्ष देण्यास सांगितलं.

भरकार्यक्रमात पंतप्रधानांसमोरच एका व्यक्तीला आली भोवळ

पंतप्रधान जमावाला संबोधित करत असताना त्यांच्या समोर एका व्यक्तीला चक्कर आली आणि ती व्यक्ती खाली कोसळली. ही घटना स्टेजवर उभ्या असणाऱ्या पंतप्रधानांच्या लक्षात येताच, त्यांनी आपलं भाषण थांबवून डॉक्टरांना त्या व्यक्तीकडे जाऊन त्याला तपासण्याचे आदेश दिले. 

पंतप्रधानांनी त्यांच्या वैयक्तिक डॉक्टरांच्या पथकाला आदेश देऊन त्या व्यक्तीला तपासण्यास सांगितलं. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, ”माझी डॉक्टरांची त्यांच्यापर्यंत पोहोचा आणि त्यांना तपासा. माझ्यासोबत जे डॉक्टर आहेत, त्यांनी या व्यक्तीला तपासा. त्यांचा हात पकडन घेऊन जा. त्यांना एका ठिकाणी बसवा.”

नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ :

 

 

 

 



[ad_2]

Related posts