VIDEO : वधूच्या मुलीसाठी लग्नाच्या स्टेजवर नवरदेवाचं भावनिक भाषण, तुमच्याही डोळ्यात येईल अश्रू

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Groom Speech For Bride Daughter Wedding Video : लग्न हा दोन जणांचं नातं एक होणं. वधू वरासाठी तो दिवस अतिशय खास असतो. सोशल मीडियावर एका लग्नाचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनं जिंकत आहे.  यात नवरदेवाने होणाऱ्या वधूच्या मुलीसाठी जे केलं त्यानंतर तुमचेही डोळे पाणावेल. 

इंस्टाग्रामवर लग्नाच्या फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना “वडिलांचे प्रेम!” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता पांढऱ्या गाऊनमध्ये वधू दिसतं आहे आणि काळा रंगाच्या सूटमध्ये नवरदेव आहे. नवरदेव वधूच्या लेकीला स्टेजवर बोलवतो आणि त्यानंतर तो जे काही करतो तो सगळ्यांचं मनं जिंकून घेत आहे. (viral video groom speech on the wedding stage for the bride daughte emotional video trending today )

सुंदर गुलाबी रंगाचा फ्रॉक घालून ती परी स्टेजवर येते. नवरदेव जो त्याचा वडील होणार आहे, तो गुडघ्यावर बसतो. अन् त्या चिमुकलीला म्हणतो की, मी सर्व पाहुण्यांसमोर सांगतो की मी तिच्यावर किती प्रेम करतो ते. हे बोलता बोलताच त्याचा भावना दाटून आल्या आणि त्याचा शब्द अडखळले. त्याचं हे प्रेम पाहून नववधूच्या डोळ्यातही पाणी येतं. ती चेहरा झाकून आपले आनंदाश्रू लपविण्याचा प्रयत्न करते. 

नवरदेव म्हणतो, आज मी तुझ्या आईशी लग्न करणार आहे आणि तुझा मुलगी म्हणून स्विकार करणार आहे. मी वचन देतो तुला की, मी कायम तुझी काळजी घेईल. मला माहिती आहे खूप वर्षांनी तू कोणाला तरी बाबा म्हणून हाक मारणार आहेस. मी कायम तुझ्यासोबत असेल आणि कुठल्याही मुलाला तुझ्या हृदयाशी खेळू देणार नाही. तू आणि तुझी आई फक्त माझे आहात. लव्ह यू बेटा असं म्हणतं तो त्या चिमुकलीला अंगठी घालून वचन देतो. 

हा व्हिडीओ काही महिन्यांपूर्वी शेअर करण्यात आली असली तरी ती आता सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ मोठ्या संख्येत पाहिला गेला आहे. या व्हिडीओमधील व्यक्ती हा तिचा सावत्र बाप असणार आहे. पण प्रत्येक वडील असे असेल तर सावत्र हा शब्दच भूतकाळ होईल. होणारे वडील आणि चिमुकलीचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. 

प्रत्येकाने पाहावा असा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओ कंमेंट्सचा पाऊस पडतोय. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील goodtimeweddings या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओवर एका यूजर्सने कंमेट केली आहे की, “अनोळखी लोकांसाठी रडणे हे दर्शवते की तुमचं हृदय किती निष्पाप आहे.” दुसर्‍या व्यक्ती लिहितो की, “तुम्ही एक अविश्वसनीय व्यक्ती आहात.” तिसऱ्या म्हणतो की, “मी माझ्या संपूर्ण आयुष्यात पाहिलेला सर्वात हृदयस्पर्शी व्हिडीओ आहे. 

Related posts