रक्षाबंधनानंतर राखी मनगटावर किती दिवस ठेवावी, नंतर तिचं काय करावं?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Raksha Bandhan 2023 Vastu Tips: भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहिण भावाच्या मनगटाला राखी बांधतात तर भाऊदेखील आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. यंदाच्या रक्षाबंधनावर भद्राचे सावट आहे. त्यामुळं 30 आणि 31 असे दोन दिवस रक्षाबंधन साजरे करता येणार आहे. यंदा पौर्णिमा 30 ऑगस्ट रोजी आहे मात्र त्यावर भद्राचे सावट आहे. त्याचमुळं दोन दिवस राखी बांधता येणार आहे. पण राखी बांधल्यानंतर ती किती दिवसांत काढावी, यासाठी काही नियम आहेत. 

राखी बांधल्यानंतर ती मनगटावरुन कधी काढावी याचेही काही वास्तू नियम आहेत. हे नियम लक्षात घेणे गरजेचे आहे नाहीतर त्याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार, रक्षाबंधन झाल्यानंतर मनगटावर बांधलेल्या राखीचं काय करावं हे सांगण्यात आले आहे. खरं तर रक्षाबंधन झाल्यानंतर राखी काढून कुठेही ठेवण्यात येते, पण ही चुक करु नये असं म्हणतात. 

राखी कधी काढावी

शास्त्रात राखी काढण्यासाठी कोणताही निश्चित दिवस किंवा वेळ ठरवण्यात आलेली नाही. रक्षाबंधन झाल्यानंतर 24 तासांनंतर तुम्ही मनटावरुन राखी काढू शकता. राखी पौर्णिमेनंतर काही दिवसांनी पितृपक्ष सुरू होईल, त्यामुळं या काळात मनगटावर राखी ठेवू नये, अशी मान्यता आहे. 

राखी काढल्यानंतर काय करावे…

राखी काढल्यानंतर ती इकडे-तिकडे कुठेही ठेवू नका. एकतर तुळशीत किंवा एखाद्या झाडाजवळ राखी ठेवा. किंवा वाहत्या पाण्यात राखी शिळवून टाका. जर राखीचा धागा तुटला असेल ती राखी जपून ठेवू नये. वाहत्या पाण्यात विसर्जन किंवा झाडाखाली ठेवावी. त्याचसोबत एक रुपयाचे नाणेदेखील ठेवावे.

धागा तुटल्यावर काय करावे

धागा तुटलेल्या राखीसोबत शिक्का झाडाखाली ठेवल्यास किंवा वाहत्या पाण्यात शिळवल्यास घरातील सुख समृद्धी व नात्यातील प्रेम सदैव टिकून राहते, अशी मान्यता आहे.

यंदा दोनदा रक्षाबंधन

रक्षाबंधनाला भद्रा योग असल्याने रक्षाबंधन कधी साजरे करावे याबाबत अनेकांमध्ये गैरसमज आहेत. पंचांगानुसार 30 ऑगस्टला पौर्णिमा तिथी सकाळी 11.00 पासून सुरु होऊन 31 ऑगस्टला सकाळी 7.07 वाजेपर्यंत असणार आहे. यात 30 ऑगस्टला भद्रा सकाळी 10.59 ते रात्री 09.00 पर्यंत असणार आहे. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts