Ethanol Price Hiked By Rs 3.71 Per Litre, Second Increase In Ethanol Price In 15 Days

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ethanol Price : केंद्र सरकारनं  2025 पर्यंत 20 पेट्रोलमध्ये  टक्के इथेनॉल (Ethanol) मिसळण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यादृष्टीनं सरकारचे प्रयत्न देखील सुरु आहेत. दरम्यान, येणाऱ्या नवीन 2024 या वर्षात 12 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल (petrol) मिळणार मिळणार आहे. 2023 पर्यंत पेट्रोलमध्ये 12 टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचे लक्ष्य टेवण्यात आले होते. पण सध्या 11.77 टक्के इथेनॉल मिसळले जाते. दरम्यान, तांदूळ आणि मक्यापासून बनविल्या जाणाऱ्या इथेनॉलच्या खरेदी दरात (Ethanol Price) देखील केंद्र सरकारने प्रतिलिटर तीन रुपये 71 पैशांची वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. पंधरा दिवसात दुसऱ्यांदा ही वाढ करण्यात आली आहे.  

तांदळापासून तयार होणारं इथेनॉल 64 रुपये लिटर तर मक्यापासूनचे 66 रुपये लिटर

दरम्यान, केंद्र सराकरनं दिलेल्या माहितीनुसार खराब तांदळापासून तयार होणारे इथेनॉल 64 रुपये लिटर आणि मक्यापासून तयार होणारे पेट्रोल 66 रुपयाने मिळणार आहे. पंधरा दिवसात दुसऱ्यांदा केंद्र सरकारनं इथेनॉलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारनं ७ ऑगस्ट रोजीच तांदळापासूनच्या इथेनॉलला 4 रुपये 75 पैसे, तर मक्यापासूनच्या इथेनॉलला 6 रुपये 1 पैसा प्रोत्साहन म्हणून जादा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर पंधरा दिवसांतच पुन्हा दरवाढ करण्यात आली आहे. इथेनॉलची निर्मिती करणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि इथेनॉल मिश्रणाचा वेग कायम ठेवण्यासाठी दरवाढ आवश्यक असल्याची माहिती देण्यात आली आहे. केंद्र सरकार आता मक्याला प्रोत्साहन देत आहे. मक्यापासून तयार केलेल्या इथेनॉलच्या किमतीत वाढ केल्यास नफा वाढण्यास हातभार लागणार आहे. .

तांदूळ आणि मक्यापासून 21.25 कोटी लिटर इथेनॉल तयार करण्याचे उद्दिष्ट 

केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, सरकारनं तांदूळ आणि मक्यापासून 21.25 कोटी लिटर इथेनॉल तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या चालू हंगामात, तेल विपणन कंपन्यांना धान्य-आधारित डिस्टिलरीजमधून 21.25 कोटी लिटर इथेनॉल खरेदी करावे लागेल. मात्र आत्तापर्यंत डिस्टिलरींनी केवळ 9.52 कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा केल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. भारतीय अन्न महामंडळ इथेनॉल तयार करण्यासाठी डिस्टिलरीजना तांदूळ पुरवठा करते. मात्र जुलैमध्ये हा पुरवठा बंद करण्यात आला आहे. कारण तांदळाची भाववाढ पाहता महामंडळाने डिस्टिलरीजना पुरवठा करणे बंद केले. त्यामुळं इथेनॉलचे उत्पादन कमी झाले आहे. तांदळाच्या कमतरतेमुळे अनेक डिस्टिलरीज बंद आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

Ethanol Fueled Car: पूर्णपणे इथेनॉलवर धावणारी जगातील पहिली कार! नितीन गडकरींनी केली नवीन कार लाँच; पाहा फिचर्स

[ad_2]

Related posts