Occrp Report On Gautam Adani Group Claims Secret Share Trading Hidden Mauritius Funds Hindenburg Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: भारतातील अब्जाधीश म्हणून लौकिक असलेल्या गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहावर गुरुवारी ओसीसीआरपी या संस्थेकडून नव्याने आरोप करण्यात आले. अदानी समूहाने सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचं सांगतानाच हिंडनबर्ग रिसर्चनेही हेच आरोप केल्याचा दावा केला. त्यावेळी हिंडनबर्ग रिसर्च या शॉर्ट सेलिंग फर्मने केलेल्या आरोपांचा मोठा फटका अदानी समूहाला सोसावा लागला आहे. त्यातून ते सावरत असतानाच आता ओसीसीआरपीने हा नवा आघात केला आहे. त्याचाही आज अदानी समूहाच्या शेअर बाजारातील सर्व दहा कंपन्यांच्या शेअर्सना फटका बसला.  

अदानी समूहाने गोपनीय किंवा अपारदर्शी पद्धतीने आपल्याच कंपनीच्या समभागात विदेशातून गुंतवणूक करुन (मॉरिशस कनेक्शन) शेअर्सचे भाव आणि समूहाचं बाजारमूल्य गैरमार्गाने वाढवलं असा आरोप ओसीसीआरपीने केला आहे. अदानी समूहाने हा सर्व गैरव्यवहार 2013 ते 2018 या पाच वर्षात केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पाच वर्षातच अदानी समूहाचा उत्कर्ष देशातील एक प्रमुख उद्योग समूह म्हणून झाला. या पाच वर्षातच अदानी समूह देशातील फक्त एक उद्योग समूहच नाही तर बलाढ्य उद्योग समूह म्हणून उदयाला आला. हा काळ अर्थातच मोदी सरकार सत्तेत येण्याच्या वर्षभराआधीचा आहे. 

अदानी समूहात अनेक गुंतागुंतीचे व्यवहार, OCCRP चा दावा 

ओसीसीआरपी म्हणजे दी ऑर्गनाईज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (The Organised Crime and Corruption Reporting Project -OCCRP) ही संस्था स्वंयसेवी म्हणजेच ना नफा ना तोटा तत्वावर तसंच लोकांच्या वर्गणीवर चालणारी असल्याचा दावा केला जात आहे. मात्र अमेरिकेतील अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांचं या संस्थेना आर्थिक पाठबळ असल्याचंही सांगितलं जातं. 

अदानी समूहात 2013  ते 2018 दरम्यान झालेल्या गैरव्यवहारामागे बरेच गुंतागुंतीचे व्यवहार आहेत. हे सहजासहजी कुणाच्याही लक्षात येणार नाहीत, असंही ओसीसीआरपीने म्हटलंय. या आरोपांमागे त्यांनी बराच तपास केल्याचाही दावा केला आहे. मॉरिशसमधील दोन फंड (विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार) यामध्ये सहभागी होते. या दोन्ही फंडाचे व्यवस्थापक हे अदानी कुटुंबीयाचेच व्यावसायिक भागीदार असल्याचा दावाही करण्यात आला आहे. 

अदानी समूहाचे संस्थापक असलेल्या गौतम अदानी यांचे ज्येष्ठ बंधू विनोद अदानी यांचे दोन निकटचे सहकारी या मॉरिशसमधील गुंतवणूकदार संस्थाचे सर्वेसर्वा होते. त्यांच्यामार्फत भारतीय शेअर बाजारातील अदानी समूहांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली. दुबईचे नासर अली शाबान अहली आणि तैवानच्या चेंग चुंग-लींग या विनोद अदानी यांच्या सहकाऱ्यांनी वर्षानुवर्षे मॉरिशसमधील गुंतवणूकदार संस्थाचा पैसा भारतात अदानी समूहाच्या कंपन्यात गुंतवला. हे व्यवहार दुबई आणि मॉरिशस येथील विनोद अदानी यांचे कर्मचारी असलेल्या नासर अहली आणि चेंग चुंग-लींग यांच्या देखरेखीखाली चालायचे असा ओसीसीआरपीचा आरोप आहे. 

सेबीला कल्पना दिली असल्याची माहिती 

भारतातील शेअर बाजार नियंत्रक असलेल्या (Securities and Exchange Board of India-SEBI) सेबीला या सर्व गैरव्यवहाराची कल्पना पुराव्यांसह त्यावेळीच दिली असल्याचा दावाही ओसीसीआरपीच्या अहवालात करण्यात आला आहे. त्यासाठी सेबीला पाठवण्यात आलेल्या एका इमेलचा संदर्भ देण्यात आला आहे. हा ईमेल कुणी केला होता, याविषयी काही स्पष्ट माहिती दिलेली नाही. त्यावेळी सेबीचे प्रमुख यूके सिन्हा हे अधिकारी होते. हेच यूके सिन्हा सध्या अदानी समूहाने ताब्यात घेतलेल्या एनडीटीव्ही या वृत्तवाहिनी कंपनीचे संचालक आणि अध्यक्ष आहेत. 

हिंडनबर्ग रिसर्च या शॉर्टसेलिंग फर्मने जानेवारीमध्ये अदानी समूहावर कथित घोटाळ्याचे आरोप केले होते. मात्र हिंडनबर्गने आपल्या शंभरपानी अहवालात सुरवातीलाच अदानी समूहाच्या शेअर्समध्ये शॉर्ट पोजिझन घेतल्याचा दावा केला होता. त्याचा सर्वाधिक फटका अदानी समूहाला बसला. जागतिक वीस श्रीमंताच्या यादीतून गौतम अदानी बाहेर फेकले गेले. त्यानंतरच्या आठ नऊ महिन्यात अदानी समूह थोडा सावरत असतानाच ओसीसीआरपी अहवालाने तेच आरोप पुन्हा नव्याने केलेत. मात्र ओसीसीआरपीने हिंडनबर्गसारखी शॉर्ट पोजिशन घेतलेली नाही, त्यामुळे अदानी समूह आता हिंडनबर्गवर केलेले प्रतिआरोप करुन स्वतःचा बचाव करु शकत नाही. ओसीसीआरपीच्या आज झालेल्या आरोपांमुळे भारतीय शेअर बाजारात नोंदणी झालेल्या अदानी समुहाच्या सर्व दहा कंपन्यांच्या शेअर्सला विक्रीचा तडाखा बसला असला तरी बाजार बंद होण्यापूर्वी त्यात थोडी सुधारणाही झाली. 

अदानी समूहाकडून आरोप फेटाळले 

हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालात प्रामुख्याने विनोद अदानी यांच्या अदानी समूहातील सहभागावर आक्षेप नोंदवण्यात आले होते. त्याचा अदानी समूहाने त्याचवेळी स्पष्टपणे इन्कार केला असला तरी त्यामुळे अदानी समूहाच्या बाजारमूल्याला तब्बल दीडशे अब्ज रुपयाची गळती लागली होती. एवढंच नाही तर जागतिक श्रीमंताच्या यादीतून गौतम अदानी बाहेर फेकले गेले. त्यानंतर अदानी समूहाकडून विनोद अदानी हे अदानी कुटुंबाचा भाग असले तरी अदानी समूहाच्या कोणत्याही कंपनीच्या दैनंदिन व्यवहारात सहभागी नसतात, असा बचाव करण्यात आला होता. 

आज अदानी समुहाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या स्पष्टीकरणात ओसीसीआरपी हा अमेरिकी भांडवलदार जॉर्ज सोरोस यांच्या पाठबळावर पोसलेला गट असल्याचा दावा करण्यात आला. कसलाही आधार नसलेल्या हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालाला पुनरुज्जीवित करण्यासाठीच काही विदेशी माध्यमांनी ओसीसीआरपीचा अहवाल प्रकाशित केल्याचा आरोपही अदानी समूहाद्वारे करण्यात आला आहे.

अदानी कुटुंबीयांनीच मॉरिशस कनेक्शनद्वारे तब्बल एक अब्ज अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक भारतीय बाजारातील अदानी समूहाच्या कंपन्यात करण्यात आल्याच्या ओसीसीआरपीच्या आरोपाचं खंडन करताना, अदानी समूहाने स्पष्ट केलं की हे सर्व आरोप बिनबुडाचे तसंच तब्बल दहाएक वर्षांपूर्वी तपासाअंती बंद करण्यात आलेल्या काही प्रकरणातील अर्धवट माहितीच्या आधारे करण्यात आले आहेत. हे सर्व आरोप तेव्हाही बिनबुडाचे होते, तसंच आताही निराधार असल्याचंही कंपनीच्या निवेदनात म्हटलं आहे. रेव्हेन्यू इंटेलिजन्सने या सर्व आरोपांतून तब्बल दशकभरापूर्वीच अदानी समूहाला क्लीनचिट दिल्याचा दावा अदानी समूहाकडून आज जारी करण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आलं. 

राहुल गांधी यांच्याकडून चौकशीची मागणी 

त्यानंतरही अदानी समूहावरआज बाजारातून विक्रीच्या हल्ल्याबरोबरच राजकीय क्षेत्रातील विरोधकांकडूनही आरोप करण्यात आले. त्यामध्ये सर्वात आधी अर्थातच काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी अदानींच्या परदेशातील शेल कंपन्याना क्लीन चिट देणाऱ्या तत्कालीन सेबीच्या संचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली. मोदी सरकारने सत्य दाबण्यासाठी बरेच प्रतत्न केले, मात्र त्यांना सत्य फार काळ दाबता आलं नाही, असा आरोपही जयराम रमेश यांनी मोदी सरकारवर केला. अदानी समूहाच्या गैरव्यवहाराची चौकशी ही फक्त संयुक्त संसदीय समितीमार्फतच करायला हवी, त्याशिवाय कोणतीही तपास यंत्रणा या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सक्षम नाही असंही त्यांनी बजावलं. मोदी सरकारच्या अखत्यारीतील प्रत्येक संस्थेकडून अदानी समूहाला क्लीनचिट मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ही बातमी वाचा :

 

[ad_2]

Related posts