I.N.D.I.A Alliance Meeting Mumbai Live Updates There Is Still No Consensus On Who Exactly Will Go To The Post Of Coordinator Opposition Party Logo Mallikarjun Kharge

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

I.N.D.I.A Alliance Meeting in Mumbai: भाजपला (BJP) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांनी एकजूट करण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधकांनी इंडिया आघाडीची (I.N.D.I.A Alliance) स्थापना केली आहे. याच इंडिया आघाडीची तिसरी महत्त्वाची बैठक मुंबईत (Mumbai News) पार पडतेय. आज या बैठकीचा दुसरा दिवस आहे. सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत सर्वपक्षीय नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत इंडिया आघाडीचा चेहरा कोण असावा? आणि इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असावा? याबाबत खलबतं होणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच, इंडिया आघाडीच्या लोगोवरही (I.N.D.I.A Alliance Logo) आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. 

इंडिया आघआडीच्या बैठकीबाबत एबीपी माझाच्या हाती एक एक्स्लुझिव्ह माहिती लागली आहे. इंडिया आघाडीच्या संयोजक पदावरुन काहीशा अडचणी उद्भवू शकतात, अशी माहिती मिळत आहे. कारण काँग्रेस मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावासाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे. खर्गे हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत आणि एक दलित चेहराही. तर दुसरीकडे काँग्रेसनं संयोजक पद न घेता मोठं मन दाखवावं, असं कम्युनिस्ट पक्ष आणि इतर काही पक्षांचं म्हणणं आहे. तसेच, यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, इंडिया आघाडीच्या संयोजक पदासाठी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचीही नावं चर्चेत आहेत. दरम्यान, संयोजक पदी अशी एखादी व्यक्ती असावी, जिच्यावर टीका करणं भाजपसाठी सोपं नसेल, असं सर्वपक्षीयांचं मत असल्याची माहिती मिळत आहे. 

इंडिया आघाडीचा संयोजक पद नेमकं कोणाकडे? संयोजक पदाचे नाव या बैठकीत जाहीर करणे अडचणीचे ठरणार?

इंडिया आघाडीचं संयोजक पद हे मल्लिकार्जुन खर्गेंना द्यावं यासाठी काँग्रेस पक्ष आग्रही आहे. संयोजक पदाबद्दल इतर नेत्यांच्या आणि पक्षांची नेमकी काय भूमिका असणार? हेदेखील महत्त्वाचं असणार आहे. मलिकार्जुन खर्गे काँग्रेसचे वरिष्ठ नेते असून एक मोठा दलित चेहरा आहे. त्यामुळे देशभरातील दलित मतं आपल्या बाजूनं वळवण्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे यांना संयोजक करावं, त्यांचा राजकीय अनुभव इंडिया आघाडीसाठी महत्त्वाचा ठरेल, असं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचं मत आहे. तर काँग्रेसनं संयोजक पद न घेता मोठं मन दाखवावं, असं कम्युनिस्ट पक्ष आणि इतर काही आघाडीतील पक्षांचं मत आहे. 

संयोजक म्हणून नियुक्ती करताना भाजप टारगेट करू शकणार नाही, अशा नेत्याला हे पद द्यावं. ज्याची स्वच्छ राजकीय प्रतिमा आहे आणि अशा नेत्याला भाजप सहजरीत्या टार्गेट करू शकणार नाही, यावर सर्व पक्षांचं एकमत झाल्याची माहिती मिळत आहे. संयोजक पदाच्या स्पर्धेत ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांचं सुद्धा नाव आहे. नितीश कुमार यांनीच सर्व विरोधी पक्षांची एकजूठ करण्यासाठी प्रयत्न सुरू केला होता. त्यामुळे मल्लिकार्जुन खर्गे यांचं नाव या स्पर्धेत असताना आणि काँग्रेसकडून आग्रह केला जात असताना, या नेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? हे सुद्धा ऐकून घ्यावं लागणार आहे. दरम्यान, असं कोडं समोर असताना मुंबईतील इंडिया बैठकीमध्ये संयोजक पदाचं नाव जाहीर केलं जाणार की आणखी वेळ घेतला जाणार? हे पाहावं लागेल. 

[ad_2]

Related posts