Lalu Prasad Yadav Full Speech INDIA Meeting Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Lalu Prasad Yadav I.N.D.I.A: पोराबाळांची खाती उघडली, मोदींनी फसवलं, I.N.D.I.A. ची सभा लालूंनी गाजवलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खोटं बोलून आणि अफवा पसरवून सत्तेत आले, आम्ही सगळे फसलो, आता इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी मोदींना सूर्यावरती पाठवावं, त्यांचं नाव जगभर होऊ दे अशी मिश्किल टिप्पणी राजदचे नेते लालू प्रसाद यादव यांनी केली. आम्ही घाबरणार नाही, मोदींना सत्तेतून हटवूनच शांत बसणार असा निश्चयही त्यांनी व्यक्त केला. 

विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीचा आजचा दुसरा दिवस आहे. यावेळी संबोधन करताना लालूप्रसाद यादव म्हणाले की, मोदींनी अफवा पसरून सत्ता प्राप्त केली. मोदी म्हणाले सत्तेत आल्यानंतर स्वीस बँकेचा पैसा परत आणतो आणि लोकांच्या खात्यामध्ये पाच पाच लाख रुपये देतो. आम्ही पण फसलो आणि बँकेत अकाऊंट उघडलं. पण अजून आमच्या खात्यात काहीच जमा झालं नाही. देशात इतकी गरीबी असताना हे म्हणतात की देशाचा विकास होतोय. इस्त्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केलं पाहिजे, त्यांनी देशाचं नाव मोठं केलं. चांद्रयान चंद्रावर पाठवलं. आता इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी मोदींना सूर्यावर पाठवावं. 

[ad_2]

Related posts