Minister Amit Shah Amrut Kalash Yatra Started Under Meri Mati-Mera Desh Campaign

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Meri Maati Mera Desh : ‘मेरी माटी-मेरा देश’ (Meri Maati Mera Desh) हा केवळ एक कार्यक्रम नसून, देशाच्या भवितव्याशी स्वतःला जोडण्याचे माध्यम असल्याचे मत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह (Minister Amit shah) यांनी व्यक्त केलं. तसेच हा कार्यक्रम म्हणजे देशाला महान बनवण्याच्या प्रक्रियेचा भाग अमित शाह यांच्या हस्ते नवी दिल्लीत ‘मेरी माटी-मेरा देश’ मोहिमेअंतर्गत अमृत कलश यात्रेला प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. देशभक्तीनं भारावलेल्या केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींसारख्या व्यक्ती हातात ‘मिट्टी’ घेऊन प्रतिज्ञा करुन ‘संकल्प से सिद्धी’ या प्रवासाची संकल्पना मांडू शकतात. बलिदान देणाऱ्यांप्रति आदरांजली अर्पण करतात असे शाह म्हणाले. 

1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत प्रत्येक घर, वॉर्ड आणि गाव एका भांड्यात ‘मिट्टी’ किंवा धान्य गोळा करतील. त्यानंतर 1 ते 13 ऑक्टोबर या कालावधीत ब्लॉक आणि नंतर 22 ते 27 ऑक्टोबर दरम्यान राज्य स्तरावर आणि शेवटी 28 ते 30 ऑक्टोबर या काळात ही 7 हजार 500 भांडी देशाची राजधानी नवी दिल्ली येथे पोहोचतील असे केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी या अमृत कलशातील माती आपल्या महान वीरांच्या सन्मानार्थ नवी दिल्ली येथे तयार करण्यात आलेल्या अमृत वाटिकेत पसरतील, जेणेकरुन प्रत्येक भारतीयाला याचे स्मरण होत राहील असे शाह म्हणाले.

लवकरच आपण तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा दरम्यान, आयोजित करण्यात आलेल्या 2 लाखांहून अधिक कार्यक्रमांनी संपूर्ण देशात पुन्हा एकदा देशभक्तीची भावना जागृत केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रेरणा आणि याच देशभक्तीच्या भावनेचा परिणाम म्हणजे नुकतेच आपले चांद्रयान चंद्रावरील शिवशक्ती बिंदूवर पोहोचले. हा क्षण सर्व देशवासियांसाठी अतिशय अभिमानास्पद असल्याचे शाह म्हणाले. आज आपली अर्थव्यवस्था जगात 11 व्या स्थानावरून पाचव्या व्या स्थानावर गेली आहे. लवकरच आपण तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू असे शाह म्हणाले. भारतातील प्रत्येक नागरिकाच्या मनात जागृत झालेला आत्मविश्वास अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून घडला आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात निर्माण झालेला आत्मविश्वास, सर्जिकल स्ट्राइक करण्यासाठी आपल्या धाडसी सैनिकांना प्रेरणा देतो. 

मेरी माटी-मेरा देश हा कार्यक्रम स्वतःला देशाला महान बनवण्याच्या प्रक्रियेचा एक भाग बनवण्याचे माध्यम बनू शकतो. 25 वर्षांनंतर जेव्हा आजची पिढी महान भारताचे नेतृत्व करेल, तेव्हा त्यांच्या मनाला समाधान वाटेल की, मागील पिढीने सामर्थ्यवान भारताच्या निर्मितीमध्ये योगदान दिले होते. स्वतःला देशासाठी पुन्हा समर्पित करण्याच्या उद्देशाने पाच कार्यक्रमांची एक नवीन मालिका तयार करण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत देशातील प्रत्येक गावात शिलालेख बसवण्यात आले आहेत.  देशातील कोट्यवधी नागरिकांनी ‘पंच प्रण’ची प्रतिज्ञा घेतली आहे. जे भारताला महान बनवण्याचा मार्ग सुकर करेल असे शाह म्हणाले. वसुधा वंदन कार्यक्रमांतर्गत अमृत महोत्सवा निमित्त आयोजित कार्यक्रमात 75 झाडे लावण्यात आली आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या:

Meri Maati Mera Desh : राज्यात आजपासून ‘माझी माती, माझा देश’ अभियान, अधिकाऱ्यांसह कर्मचारी घेणार पंचप्रण शपथ

[ad_2]

Related posts