[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
अहमदनगर : जालना (Jalna) येथील घटनेचे राज्यभरात पडसाद उमटत असून ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. तर काल सायंकाळी उशिरा अनेक ठिकाणी वाहनांची जाळपोळ देखील करण्यात आली. यात अनेक बसेसचा देखील समावेश असल्याने खबरदारी म्हणून राज्यातील अनेक भागातील बससेवा बंद करण्यात आली आहे. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील 630 आज पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर सोलापूरसह नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातही अनेक बसफेऱ्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत.
अनेकदा आंदोलन झाल्यानंतर एसटी महामंडळाच्या (ST Mahamandal) बसेसना लक्ष्य करण्यात येतं. त्यामुळे मोठं नुकसान झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी देखील निदर्शनास आलेल्या आहेत. सध्या जालना येथील मराठा समाजाच्या (Maratha Reservation) आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर जाळपोळ झाली होती. त्यात एसटी बसेसचे नुकसान करण्यात आले. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील एसटी वाहतूक बंद करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील 11 डेपोतील 630 बसेस आज पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती विभागीय नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी दिली आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यातही बंद पुकारण्यात आला होता, मात्र बंद मागे घेण्यात आला आहे, मात्र बससेवा बंद ठेवण्यात आली आहे.
जालना येथील घटनेच्या निषेधार्थ आज राज्यातील अनेक भागात आंदोलन सुरु आहेत. त्यामुळे खबरदारीच्या पार्श्वभूमीवर आज अनेक भागातील बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील 11 तालुक्यातील जवळपास 630 बसेस बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. तर नंदुरबार जिल्ह्यात अनेक संघटनांकडून बंद पुकारण्यात आला होता, तो बंद मागे घेण्यात आला असला तरीही जिल्ह्यातील काही भागातील बससेवा बंद (Bus Service) ठेवण्यात आली आहे. बसेसचे संभाव्य नुकसान लक्षात घेऊन एसटी महामंडळाने निर्णय घेतला असून यामुळे प्रवाशांचे मात्र हाल असल्याचे चित्र आहे. तसेच काही अनुचित प्रकार घडू नये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
तसेच जालन्यातील घटनेनंतर सोलापुरातून (Solapur) मराठवाड्याकडे जाणारी एसटी सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सोलापुरातून मराठवाड्याकडे जाणारी एसटी पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. जालना येथील घटनेनंतर एसटी बसेसवर झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनानंतर खबरदारी घेण्यात आली आहे. आज सकाळपासून सोलापूर विभागातील मराठवाडाकडे जाणाऱ्या 54 फेऱ्या रद्द केल्या आहेत. इतर भागात मात्र पोलिसांच्या सूचनेनुसार वाहतूक सुरळीत सुरू आहे, अशी माहिती सोलापूर विभाग नियंत्रक विनोद भालेराव यांनी दिली आहे.
राज्यातील अनेक भागात आंदोलन
दरम्यान जालना येथील घटनेच्या निषेधार्थ राज्यातील अनेक भागात मराठा संघटनांकडून आंदोलन करण्यात येत आहे. नाशिक शहरात संभाजी ब्रिगेड, मराठा संघटना यांच्याकडून आंदोलन करण्यात आले. गंगापूर-लासूर स्टेशन राज्य महामार्ग 39 शेकटा फाटा येथे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयांकडून टायर जाळून मराठा बांधवावर लाठीचार्ज निषेधार्थ रास्ता रोको करण्यात आलं. मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी रास्ता रोको करत बराच वेळ आंदोलकांनी रास्ता रोको केला. बुलढाण्यातील देऊळगावमध्ये मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. मराठा क्रांती मोर्चा आणि स्वराज्य पक्षातर्फे नवी मुंबईत निषेध आंदोलन करण्यात आले. जालना येथील आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज विरोधात बीड जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला आहे माजलगावमध्ये देखील मराठा समाज बांधवांकडून शहर बंदीची हाक देण्यात आली आहे.
इतर महत्वाची बातमी :
Live Updates : लाठीहल्ल्याची जबाबदारी गृहमंत्र्यांची, फडणवीसांनी राजीनामा द्यावा: रोहित पवार
[ad_2]