Giripremi Mountaineers Becomes First Indian Group To Climb Mount Meru Maharashtra Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुण्यातील गिरीप्रेमी नावाने ओळखल्या जाणाऱ्या गिर्यारोहण क्लबने थेट मेरू पर्वतावर यशस्वी चढाई केली आहे. अशी यशस्वी एकत्र चढाई करणारा गिरीप्रेमी हा पहिला भारतीय गृप बनला आहे. गढवाल हिमालयात हे मेरु पर्वत आहे. चढाईसाठी सगळ्यात कठीण अशी या पर्वताची ओळख आहे. 6660 मीटरच्या प्रचंड उंचीवर उभा आहे.  हा ट्रेक करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे अनेक ट्रेकर हा ट्रेक करण्याचं स्वप्न पाहत असतात मात्र पुण्यातील गिरीप्रेमी या गृपने यशस्वी चढाई करुन त्यांचं स्वप्न पूर्ण केलं आहे.

माउंट मेरू शिखरावर चढाई करणाऱ्या गिर्यारोहकांमध्ये गणेश मोरे (माउंट एव्हरेस्ट व माउंट च्योयु शिखरवीर), विवेक शिवदे (माउंट कांचनजुंगा, माउंट अमा दब्लम, माउंट मंदा शिखरवीर), वरुण भागवत (तरुण गिर्यारोहक, माउंट भ्रिगु पर्वत शिखरवीर), गिरीप्रेमींचे सदस्य आणि एव्हरेस्टसह विविध शिखरांवर अनेकवेळा चढाई केलेले जागतिक किर्तीचे गिर्यारोहक मिंग्मा शेर्पा आणि एव्हरेस्ट शिखरवीर आणि नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंगचे वरिष्ठ प्रशिक्षक विनोद गुसाई यांचा समावेश आहे. 

यापूर्वी केला होता प्रयत्न पण…

याच वर्षी मे महिन्यामध्ये गिरिप्रेमीच्या संघाने माउंट मेरू मोहीम आयोजित केली होती. मात्र खराब हवामानाने संपूर्ण मोहिमेदरम्यान संघाची परीक्षा पाहिली, शेवटी शिखरमाथा अवघ्या 200 मीटरवर असताना संघाला परतावे लागले होते. या मोहिमेतून आलेले अनुभव आणि शिकवणीचा फायदा यावेळी झाला. संघाचा मुक्काम 25 ऑगस्ट पासून किर्ती बमक ग्लेशियरवर वसलेल्या बेस कॅम्प (4800 मीटर) वर होता. हिमालयात सतत होणाऱ्या पावसामुळे यावेळी देखील हवामान साथ देते की नाही? हा प्रश्न गिर्यारोहकांसमोर होता. मात्र, सुदैवाने हवामानाने यावेळी साथ दिल्याने शिखर चढाईसाठी मदत झाली.

कॅम्प 1 (5500 मीटर) पासून शिखरमाथ्यापर्यंत संपूर्ण खडी चढाई आहे. यात रॉक क्लायम्बिंग आणि आईस क्लायम्बिंग या दोन्हीच्या कौशल्यांची गरज भासते. गिरिप्रेमीच्या निष्णात आणि निपुण गिर्यारोहकांनी सलग दहा तास चढाई करून कॅम्प 1 पासून पुढे शिखरमाथ्यावर चढाई केली आणि भारतीयच नव्हे तर जगाच्या गिर्यारोहण इतिहासामध्ये नाव कोरलं आहे. या आधी गिरीप्रेमीने जगातील 14 पैकी आठ अष्टहजारी शिखरांना गवसणी घातली आहे. यात एव्हरेस्ट, कांचनजुंगा, अन्नपूर्णा यांसारख्या खडतर शिखरांचा समावेश आहे. सोबतच माउंट मंदा या भारतीय हिमालयातील शिखरावर देखील यशस्वी मोहीम करण्यात गिरीप्रेमीला यश आले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या :

Pune Crime News : लष्करी अधिकारी म्हणून वावरत असलेला तरुण पुणे रेल्वे स्थानकावर जेरबंद

[ad_2]

Related posts