( प्रगत भारत । pragatbharat.com)
2 Sisters Gang Raped: छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरमध्ये मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. 30 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशीच 10 जणांनी 2 सख्ख्या बहिणींवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आळी आहे. आरोपींनी या तरुणीच्या प्रियकरासमोरच तिच्यावर बलात्कार केला. दोन्ही बहिणी महासमुंद येथून आपल्या भावाला राखी बांधून घरी परत येताना हा प्रकार घडला.
15 दिवसांची पोलीस कोठडी
आरोपींनी आधी या दोघींची छेड काढली. त्यानंतर निर्जनस्थळी नेऊन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. या तरुणींबरोबर असलेल्या एका तरुणालाही त्यांनी मारहाण केली. हा प्रकार समोर आल्यानंतर छत्तीसगडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी 10 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींना कोर्टात हजर केलं असता कोर्टाने त्यांना 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी कोर्टातून तुरुंगापर्यंत या आरोपींची धिंड काढली. मात्र यावेळेस स्थानिकांनी या आरोपींना मारहाण करण्याचा प्रयत्न केला.
…अन् आमच्यावर सामूहिक बलात्कार केला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 30 ऑगस्ट रोजी मंदिरा हसौद पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या रिम्स कॉलेजजवळ घडली. मध्यरात्रीनंतर 1 वाजण्याच्या सुमारास या दोन्ही बहिणी मंदिर हसौद पोलीस स्टेशनमध्ये आल्या. पीडितेने पोलिसांकडे केलेली लेखी तक्रारीमध्ये ती आणि तिची बहिण ओळखीच्या एका तरुणाबरोबर भावाला राखी बांधून परत येत होती. “तिघे जण स्कुटीवरुन भानसोज मार्गे रायपूरला परत येत असतानाच समोर एका बाईकवरुन 3 तरुण प्रवास करत होते. त्यांनी हात दाखवून आम्हाला थांबवलं. त्यांनी आम्हाला धमकावून आमच्याकडून मोबाईल आणि पैसे घेतले. त्यानंतर थोड्यावेळाने मागून 4 बाईकवर इतर तरुण त्या ठिकाणी आले. त्यांनी आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली आणि काही अंतरावर नेऊन आमच्यावर सामूहिक बलात्कार केला,” असं पीडितेनं सांगितलं. या मुलीबरोबर असणारा ओळखीचा मुलगा म्हणजे तिचा प्रियकर असल्याची माहितीही समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच…
या घटनेची माहिती मिळथाच वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रशांत अग्रवाल यांनी अतिरिक्त पोलीस निरिक्षक नीरच चंद्राकर, चंचल तिवारी, उप पोलीस निरिक्षक अविनास मिश्रा, दिनेश सिन्हा, ललिता मेहर आणि 6 हवालदारांनी तातडीने घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले. तसेच आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेशही देण्यात आले. त्यानंतर अग्रवाल हे स्वत: मंदिर हसौद पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी स्वत: या तरुणींकडून घडलेला घटनाक्रम ऐकून घेतला. आरोपी अज्ञात असल्याने पोलिसांनी या तरुणींच्या मदतीने त्यांची चित्र तयार केली. पोलिसांनी रेखाटलेली ही चित्रं पंचक्रोषीतील पोलीस स्टेशनमध्ये पाठवून देण्यात आळी.
3 तासांमध्ये 8 जणांना अटक
पोलिसांनी रायपूरच्या आजाबाजूच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी, छापेमारी करुन 8 आरोपींना अटक केली. केवळ 3 तासांमध्ये या आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींची नावं पूनम ठाकुर, घनश्याम निषाद, लव तिवारी, नयन साहू, केवल वर्मा उर्फ सोनू, देवचरण धीवर, लक्ष्मी ध्रुव, प्रहलाद साहू हैं, कृष्णा साहू, युगल किशोर अशी आहेत. यापैकी 5 आरोपी पिपरहट्टा गावीतल आहेत तर अन्य आरोपी बोरा, अमरिया आणि टेकारी या आजूबाजूच्या गावांमधील आहेत.
13 दिवसांपूर्वीच जामीनावर बाहेर आला होता
मुख्य आरोपी असलेला पूनम ठाकूर हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्याविरोधात मंदिर हसौद पोलीस स्टेशनमध्ये 5 गुन्हे दाखल आहे. 2019 मध्ये हत्येच्या प्रकरणामध्ये रायपूर पोलिसांनी त्याला अटक करुन तुरुंगात टाकलं होतं. 2022 मध्ये त्याला बलात्कार प्रकरणामध्ये रायपूर पोलिसांनी अटक केली होती. 17 ऑगस्ट 2023 रोजी तो पुन्हा जामीनावर बाहेर आल्यानंतर त्याने 2 आठवड्यांच्या आत पुन्हा एकदा बालत्कार केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.