Shinde Group Aggressive Against Udhayanidhi Stalin Rahul Kanal Complaint In Mumbai Police

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Udhayanidhi Stalin Sanatana Remarks:  तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन (M K Stalin) यांचे सुपुत्र आणि आमदार उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे. शिंदे गटाचे नेते राहुल कनाल यांनी उदयनिधींविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. तसंच, उदयनिधी यांच्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलन करण्याचीही तयारी शिंदे गट करत असल्याची माहिती आहे.  

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे सुपुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली होती. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे. इंडिया आघाडीत असलेल्या ठाकरेंनी स्टॅलिन यांना उत्तर देऊन दाखवावं, असं ट्विट शिंदे यांनी केलंय. तसंच, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकांना अशा हिंदुविरोधी वक्तव्याचा कडक विरोध करण्यास सांगितलं असतं. 

स्टॅलिन यांना महाराष्ट्रात येण्यास बंदी घालावी  

स्टॅलिन यांच्या वादग्रस्त पोस्टनंतर मुंबई उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आक्रमक झाले आहेत. उदयनिधी स्टॅलिन यांना महाराष्ट्रात येण्यास बंदी घालावी, अशी मागणी  लोढा यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी  केली आहे.  महाराष्ट्रातील वातावरण बिघडू देणार नाही. तसेच  सनातन धर्म संपवण्याचे वक्तव्य  आणि हिंदूचा अपमान करणारे स्टॅलिन वक्तव्य मागे घेत नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्रात येऊ देणार नाही, असा थेट इशारा  लोढा यांनी स्टॅलिन दिला आहे.

उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मांची तुलना मलेरिया आणि डेंग्यूशी केली आहे.त्यांच्या वक्तव्यानंतर उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर भाजपाकडून टीका करण्यात येत  आहे. मात्र उदयनिधी स्टॅलिन आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत.   

काय म्हणाले उदयनिधी स्टॅलिन?

उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींचा विरोध करता येत नाही. त्या संपवल्याच पाहिजे. ज्याप्रमाणे आपण डेंग्यू, मलेरिया किंवा करोनाचा विरोध करू शकत नाही. त्याला संपवलच पाहिजे. तसेच, सनातन धर्मालाही संपवायचं आहे. 

उदयनिधी स्टॅलिन वक्तव्यावर ठाम

उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर टीका  झाल्यानंतर त्यांनी आपल्या  वक्तव्यावर  ठाम असल्याचं सांगितलं आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी म्हटलं,सनातन धर्माला मानणाऱ्यांना संपवण्याची भाषा मी केली नाही. माझ्या वक्तव्याबाबत कोणत्याही कायदेशीर गोष्टींना सामोरं जाण्यासाठी मी तयार आहे.

हे ही वाचा:

 



[ad_2]

Related posts