Teachers Day 2023 Marathi News Importance Of Education Special Day Know History

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

TEACHERS DAY 2023: 5 सप्टेंबर 1888… इतिहासात (History) नोंद झालेली ही तारीख खूप महत्त्वाची आहे. कारण या दिवशी भारताचे (India) पहिले उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (Dr. Sarvepalli Radhakrishnan) यांचा जन्म झाला. ते एक महान विद्वान आणि तत्त्वज्ञ होते. ज्यांनी देशातील शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले. दरवर्षी या तारखेला, भारतात शिक्षक दिन (Teachers Day 2023) साजरा केला जातो. हा दिवस भारतीय विद्यार्थ्यांच्या जीवनात मोठी भूमिका बजावणाऱ्या सर्व शिक्षकांना पूर्णपणे समर्पित आहे. या विशेष दिवसाचा स्वतःचा इतिहास आणि महत्त्व आहे. जाणून घ्या…

‘या’ खास दिवसाचा खास इतिहास…

वर्ष 1962… डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी नुकताच भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला होता. संपूर्ण देशात जल्लोषाची लाट होती. त्यामुळे एकेकाळी त्यांच्यासोबत शिकलेले त्यांचे विद्यार्थी एका खास उद्देशाने त्यांच्यापर्यंत पोहोचले. विद्यार्थ्यांची विनंती होती की डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती म्हणजेच, 5 सप्टेंबर हा विशेष दिवस म्हणून साजरा करण्याची परवानगी मागितली होती. डॉ. राधाकृष्णन जागी दुसरे कोणी असते तर त्यांनी लगेच होकार दिला असता, पण त्यांनी तसे केले नाही. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना विनंती केली की, “माझा वाढदिवस वेगळा साजरा करण्याऐवजी हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला तर मला अभिमान वाटेल” त्यांच्या या बोलण्याने सर्वांची मने जिंकली, त्यानंतर हा विशेष दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला.

“शिक्षणाचे महत्त्व समजून घ्या…”

“खरा शिक्षकच समाजाला योग्य दिशा दाखवतो…” या महान विचाराने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपले संपूर्ण आयुष्य आपल्या भारत देशाच्या शिक्षण व्यवस्थेसाठी समर्पित केले. आयुष्यातील जवळपास 40 वर्षे शिक्षक म्हणून काम करताना त्यांनी अनेक मुलांना शिकवले.

शिक्षकांचेही आभार माना

शिक्षणासाठी पूर्णपणे समर्पित असलेले डॉ. राधाकृष्णन नेहमीच शिक्षकांचा आदर आणि सन्मान यावर भर देत असत. देशाच्या शिक्षण व्यवस्थेत शिक्षकांचे महत्त्वाचे योगदान आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खरा गुरू आपल्या शिष्याला नकारात्मक परिस्थितीतही खंबीरपणे उभे राहण्यास आणि अडचणींचा सामना करण्यास शिकवतो. अशा परिस्थितीत या खास दिवशी तुम्ही तुमच्या खास शिक्षकांचेही आभार मानले पाहिजेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Teachers Day 2023: भारतात शिक्षक दिनाची सुरुवात कशी झाली? 5 सप्टेंबरला शिक्षक दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या

[ad_2]

Related posts