[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) फळांचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आरोग्य तज्ज्ञही लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच दररोज फळे खाण्याचा सल्ला देतात. फळांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स यांसारख्या पोषक तत्वांचा भरपूर प्रमाणात समावेश असतो, ज्यामुळे शरीराला अनेक आजारांपासून संरक्षण मिळते. पण योग्य वेळी फळे खाल्ल्यासच आपल्याला त्याचा फायदा मिळू शकेल. फळे कुठेही आणि कधीही खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. रात्रीच्या वेळी फळांचे सेवन केल्याने आरोग्याला हानी पोहोचते का? या ना अनेक मिथ्सबाबत हेल्थलाईनने सांगितले आहे, तो रिपोर्ट जाणून घेऊया. रात्री काही फळे खाल्ल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो. यामुळे तुम्हाला गॅस, अॅसिडिटी आणि ब्लोटिंगच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही फळांबद्दल सांगणार आहोत, जे रात्री अजिबात खाऊ नयेत. (फोटो सौजन्य – iStock)
[ad_2]