[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
केंद्र सरकारने इंडिया (India) या नावाऐवजी फक्त ‘भारत’ (Bharat) हे नाव वापरणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.
केंद्र सरकार आता अधिकृतपणे इंडिया हे नाव वगळून भारत हेच नाव ठरवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसे झाल्यास पाकिस्तान इंडिया या नावावर आपला दावा सांगणार असल्याचे वृत्त आहे. ‘साऊथ एशिया इंडेक्स’ यांनी याबाबतचे ट्वीट केले आहेे.
Just IN:— Pakistan may lay claim on name “India” if India derecongnises it officially at UN level. – local media
— Nationalists in Pakistan have long argued that Pakistan has rights on the name as it refers to Indus region in 🇵🇰.
— South Asia Index (@SouthAsiaIndex) September 5, 2023
केंद्र सरकारने देशाचे नाव बदलल्यास संयुक्त राष्ट्रसंघातही इंडिया ऐवजी भारत असे नाव बदलावे लागणार आहे. असे झाल्यास पाकिस्तान हे इंडिया या नावावर दावा करणार असून तशी तयारी केली असल्याचे वृत्त साऊथ एशिया इंडेक्सने प्रसिद्ध केले आहे.
पाकिस्तानमधील काही राष्ट्रवादी घटकांनी याआधी देखील इंडिया हे नाव इंड्स प्रदेशावरून पडलं असल्याचे सांगत दावा केला होता. इंड्स हे नाव सिंधु नदीच्या खोऱ्यावरून पडले. त्याचेच पुढे इंड्सवरून इंडिया असे म्हटले जाऊ लागले.
भारतीय राज्यघटनेत India that is Bharat..shall be union of states. असं नमूद करण्यात आले आहे. याचाच अर्थ इंडिया आणि भारत अशी दोन्ही नावे अधिकृत आहेत.
तर, इंडियाऐवजी भारत असा उल्लेख व्हावा ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जुनी मागणी आहे. काही दिवसांपूर्वी सरसंघचालकांनी या भूमिकेचा पुनरुच्चार केला होता.
(नोट- असा दावा ट्विटरच्या माध्यमातून करण्यात आला आहे.)
हेही वाचा
केंद्र सरकार राज्यघटनेतील ‘इंडिया’ नाव बदलून ‘भारत’ करण्याच्या तयारीत?
[ad_2]