Kota District Collector,खचू नका, मी तुमच्या पाठीशी! कोटाच्या जिल्हाधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना भावनिक पत्र – kota district collector’s emotional letter to students

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

वृत्तसंस्था, कोटा (राजस्थान) : ‘विद्यार्थ्यांनो, खचू नका. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’, असे पत्र लिहित जिल्हाधिकारी ओ. पी. बुनकर यांनी कोटा येथील क्लासेसमध्ये जेईई, नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना धीर दिला आहे. नीट आणि जेईईच्या क्लासेसमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी बनकर यांनी रविवारी विद्यार्थ्यांना पत्राद्वारे प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे.

अपयशाने खचू नका, असे आवाहन करताना जिल्हाधिकारी बुनकर यांनी पत्रात नमूद केले आहे, की “जर एक मार्ग बंद झाला असला तरी दुसरा मार्ग तुमच्यासाठी खुला आहे. त्यासाठी धीर धरा. तुम्ही या शहरात एकटे नाही; मी आहे ना तुमच्यासोबत! तुमच्यासाठी माझे कार्यालय आणि घराचे दरवाजे सदैव खुले आहेत. कोणताही तणाव, भीती असेल तर माझ्यासोबत मनमोकळेपणे बोला.” जिल्हाधिकाऱ्यांचे हे प्रोत्साहनपर पत्र कोचिंग क्लासेस, वसतिगृह आणि अतिथीगृहाच्या फलकांवर लावण्यात आले आहे.

देशभरातील अडीच लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी सध्या कोटा येथे नीट, जेईईच्या परीक्षेची तयारी करीत आहे. यंदा सर्वाधिक २२ विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तणावामुळे आत्महत्या केल्या आहेत. गेल्या वर्षी ही संख्या १५ पर्यंत होती. दिवसभर व्यस्त, गुणांसाठी सुरू असलेली प्रचंड स्पर्धा, सर्वोत्तम करण्याचा तणाव, पालकांच्या अपेक्षा आणि घरापासून दूर राहण्यामुळे आलेले एकटेपण ही आत्महत्येमागची कारणे पुढे आली आहेत.
कोटामधील विद्यार्थ्यांचे जीव वाचवण्यासाठी ‘दरवाजे पे दस्तक’; या लोकांवर सोपवण्यात आली मोठी जबाबदारी
‘पालकांचा तरी विचार करा’

जिल्हाधिकाऱ्यांनी आत्महत्येच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी पत्रात विद्यार्थ्यांना भावनिक आवाहन करताना म्हटले आहे, की तुमच्यामागे पालकांचे काय होईल, याचा विचार करा. त्यांनी तुमच्यासाठी स्वप्न पाहिले आहे, त्या स्वप्नांसाठी तुम्ही कटिबद्ध व्हा. बुनकर यांनी काही विद्यार्थ्यांशी संवाद साधताना घालविलेल्या आनंदाचे क्षणही पत्रात नमूद केले.

[ad_2]

Related posts