[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
घटना मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरची आहे. शहरातील थाटीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तारामाई वसाहतीत ध्यान सिंह राठोड मध्य प्रदेश पोलीस दलात हवालदार आहेत. ध्यान सिंह यांचा विवाह २०१७ मध्ये भिंडमध्ये राहणाऱ्या ज्योती ठाकूर यांच्याशी झाला. त्यांनी सनी (वय सव्वा तीन वर्षे) आणि मोनू (दीड वर्षे) अशी दोन मुलं आहेत. दिवसभर घरात बसून कंटाळा येत असल्यानं घराखाली दुकान उघडून द्या. माझा वेळ जाईल आणि घरात चार पैसे अधिकचे येतील असं ज्योतीनं पतीला सांगितलं.
ध्यान सिंह यांनी पत्नीचं ऐकलं. घराच्या खाली दुकान थाटलं. त्यात प्लास्टिकशी संबंधित वस्तू विकण्यास सुरुवात केली. ज्योती हे दुकान सांभाळायची. यानंतर अचानक ज्योतीनं पतीला दुकान बंद करायला सांगितलं. दुकानात बसणं ठीक वाटत नाही. तुम्ही आता दुकान बंद करा, असं तिनं पतीला म्हटलं. त्यावर आधी दुकानातील सर्व सामान तर संपू दे, त्यानंतर दुकान बंद करू, अशा शब्दांत ध्यान सिंह यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला.
या दरम्यान २८ एप्रिल २०२३ रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास त्यांचा मुलगा जतिन उर्फ सनी छतावरुन पडला आणि जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र दुसऱ्याच दिवशी त्याची प्राणज्योत मालवली. हा प्रकार अपघात असल्याचं कुटुंबाला वाटलं. काही दिवसांत घरातील स्थिती पूर्वपदावर आली. जतीनच्या मृत्यूनंतर ज्योती घाबरुन राहू लागली. रात्री झोपेतून अचानक उठायची. लेकाच्या मृत्यूचा ज्योतीवर मानसिक आघात झाल्याचं ध्यान सिंहला वाटलं. दिवसागणिक तिची प्रकृती आणखी बिघडू लागली. डॉक्टरांकडे जाऊनही काही फरक पडला नाही.
ज्योतीला रात्री स्वप्नात तिचा मृत मुलगा जतिन वारंवार दिसत होता. घरात जतीनचा आत्मा भटकत असल्याचा भाव तिला व्हायचा. त्यामुळे तिचं जगणं अवघड झालं होतं. त्यामुळे तिनं पतीसमोर हत्येची कबुली दिली. रागाच्या भरात जतिनला छतावरुन ढकलल्याचं तिनं सांगितलं. ज्योतीनं ध्यान सिंहला दुकान बंद करण्यास सांगितलं होतं. पण पतीनं दुर्लक्ष केलं. त्यामुळे ज्योतीनं एक कट रचला. दुकान अशुभ असल्याचं तिला पतीला दाखवून द्यायचं होतं. त्यासाठीच तिनं सव्वा तीन वर्षांच्या जतीन उर्फ सनीला छतावरुन धक्का दिला. जतीनला किरकोळ दुखापत होईल असा अंदाज होता. पण त्याचा जीव गेला. त्याचा जीव घेण्याचा मानस नव्हता, असं ज्योतीनं पतीला सांगितलं.
संपूर्ण घटनाक्रम ऐकून पती ध्यान सिंहला धक्काच बसला. पत्नीला शिक्षा व्हायला हवी असं त्यानं मनोमन ठरवलं. पण या घटनेचा कोणताही पुरावा किंवा साक्षीदार नव्हता. त्यामुळे त्यानं पत्नी ज्योतीलाच विश्वासात घेतलं. तो सतत त्या घटनेबद्दल पत्नीशी बोलायचा. त्यासोबतच सगळा संवाद मोबाईलमध्ये रेकॉर्ड करू लागला. घटनेच्या वेळेबद्दल विचारताच ज्योती वेगवेगळी उत्तरं देऊ लागली. छतावर जाऊन पोलीस पतीनं क्राईम सीन रिक्रिएट करायचा प्रयत्न केला. पण ज्योती वेगवेगळी माहिती देत होती. त्यामुळे पतीचा संशय वाढला. त्यानंतर तिनं पुन्हा एकदा रडतरडत गुन्ह्याची कबुली दिली. जीव घेण्याच्या इराद्यानंच जतीनला खाली फेकल्याचं तिनं सांगितलं. त्यामागचं कारण ती कधी दुकान, तर कधी अन्य काही सांगायची.
पुरेसे ऑडिओ आणि व्हिडीओ पुरावे गोळा केल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनंतर म्हणजेच जून महिन्यात थाटीपूर पोलीस ठाण्यात ध्यान सिंहनं पोलीस ठाण्यात जाऊन पत्नीविरोधात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तपास हाती घेतला. पोलिसांनी ज्योतीला अटक केली आणि चौकशी सुरू केली. सुरुवातीला ज्योतीनं पतीप्रमाणेच अन्य पोलीस कर्मचाऱ्यांचीही दिशाभूल केली. इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगितल्या. पण पोलिसी खाक्या दाखवताच तिनं संपूर्ण सत्य सांगितलं.
जतीनचा मृत्यू निव्वळ अपघात असल्याचं पती ध्यान सिंह आणि त्याच्या कुटुंबाला वाटत होतं. पण प्रत्यक्षात त्याचा खून झाला होता आणि तो विवाहबाह्य संबंधातून झाला होता. ज्योतीचे तिचा शेजारी उदय इंदौलियाशी अवैध संबंध होते. २८ एप्रिलच्या संध्याकाळी ज्योतीच्या सासरी कौटुंबिक कार्यक्रम होता. ध्यान सिंह आणि कुटुंबीय नातेवाईकांच्या पाहुणचारात व्यग्र होते. या दरम्यान रात्रीच्या सुमारास ज्योती तिचा प्रियकर उदयला भेटायला छतावर गेली होती.
आईला छतावर जाताना पाहून सव्वा तीन वर्षांचा जतीनही पाठोपाठ गेला. त्यानं आईला तिच्या प्रियकराच्या बाहुपाशात पाहिलं. जतीन ही गोष्ट घरात सांगेल आणि आपलं पितळ उघडं पडले याची भीती ज्योतीला वाटली. त्याच भीतीपोटी तिनं जतीनला छतावरुन फेकलं. उंचावरुन पडल्यानं जतीनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जतीनला अपघात झाल्याचं कुटुंबाला वाटलं. त्यांनी त्याला जयारोग्य रुग्णालयात दाखल केलं. पण त्याचा जीव वाचू शकला नाही. घटनेनंतर ज्योतीचा प्रियकर फरार झाला. त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
[ad_2]