Aditya l 1 takes Selfie And Photo Of Moon Earth; आदित्य एल १ नं काढला सेल्फी, पृथ्वी आणि चंद्राचा फोटो देखील इस्त्रोकडून शेअर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बंगळुरु : चांद्रयान ३ प्रमाणं इस्त्रोकडून आदित्य एल १ मोहिमेसंदर्भात अपडेट दिल्या जात आहेत. इस्त्रोकडून आदित्य एल १ चा प्रवास कसा सुरु आहे यासंदर्भातील माहिती शेअर करण्यात येत आहे. सध्या आदित्य एल १ मिशन योग्य प्रकारे कार्यरत आहे. त्यानं इस्त्रोकडे सेल्फी पाठवून त्यावर लावण्यात आलेले कॅमेरे सुस्थितीत असल्याची माहिती दिली. याशिवाय आदित्य एल १ नं पृथ्वी आणि चंद्राचा फोटो देखील टिपला आहे. याशिवाय एक व्हिडिओ देखील बनवला आहे. इस्त्रोकडून तो शेअर करण्यात आला आहे.

आदित्य एल १ यान १८ सप्टेंबर पर्यंत पृथ्वीच्या चारी बाजुनं ऑर्बिट बदलेलं. पुढील ऑर्बिट मॅन्युवरिंग १० सप्टेंबरला रात्री होणार आहे. आदित्य एल १ यान लँग्रेड १ पॉइंटला पोहोचल्यावर दरदिवशी इस्त्रोकडे १४४० फोटो पाठवणार आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी याचा फायदा होणार आहे. हे फोटो आदित्य एल १ यानावर लावण्यात आलेले विझिबल एमिशन लाइन कोरोनाग्राफ म्हणजेच वीईएलसी द्वारे टिपले जाणार आहेत.

आदित्य एल १ नं टिपलेला फोटो

पुणे भाजप ‘इलेक्शन मोड’मध्ये, फडणवीसांची भेट, मोर्चेबांधणीला सुरुवात, महत्वाची मागणीही केली

वैज्ञानिकांच्या माहितीनुसार सूर्याचा पहिला फोटो फेब्रुवारीमध्ये मिळेल. वीईएलसी ची निर्मिती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एस्ट्रोफिजिक्सनं केली आहे. इस्त्रोच्या आदित्य एल १ मिशनमध्ये VELC कॅमेरा सूर्याचे एचडी फोटो घेईल.

आदित्य एल १ मिशनचा लँग्रेड पॉइंट पर्यंतचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर सर्व पेलोडस ऑन केला जाणार आहे. म्हणजेच आदित्य एल १ यानात लावलेली सर्व उपकरणं सक्रीय होतील आणि ती सूर्याचा अभ्यास सुरु करतील. दरम्यानच्या काळात चाचणीसाठी देखील ती सुरु केली जातील.

इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी आदित्य एल १ मिशनची निर्मिती पाच वर्षांसाठी केली आहे. यान योग्य राहिलं तर पुढील १० ते १५ वर्ष ते काम करु शकतं. लँग्रेज १ पॉइंट पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर अंतरावर आहे.
Dahihandi 2023 : जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाचे ‘ढाक्कुमाकुम’, सरनाईकांच्या दहीहंडीत नऊ थरांची सलामी
दरम्यान, सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान ५ लँग्रेड पॉइंट आहेत. भारताचं सूर्ययान लँग्रेज पॉइंट १ या ठिकाणी प्रस्थापित केलं जाणार आहे. कारण त्याठिकाणी अवकाश यानाचं इंधन कमी प्रमाणात खर्च होतं.

Maratha Reservation: तुमची प्रमुख मागणी पूर्ण झालेय, जरांगे-पाटलांनी विषय जास्त ताणू नये: विखे-पाटील

LIVE : चंद्रानंतर सूर्याला गवसणी घालण्यासाठी इस्त्रो सज्ज, आदित्य L1 चं लाँचिंग



[ad_2]

Related posts