[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Nitesh Rane : उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांकडे (Farmers) बघितले पण नाही आणि हल्ली शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली. उद्धव ठाकरे हे पावसात भिजले होते की संजय राऊतांनी (Sanjay Raut) बिसलेरीनं पाणी ओतलं होतं असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच राज्याचा मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला प्रोटोकोल कळत नाही असे म्हणत उद्धव ठाकरेंच्या जळगाव (Jalgaon) दौऱ्यावरुन देखील राणेंनी टीका केली. ते कणकवलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या जळगाव दौऱ्यावर देखील टीका केली. प्रशासनाने आदेश देऊनही नाक रगडायला जळगावला गेले आहेत. स्वतःचे कार्यक्रम बंद झाल्यानं दुसऱ्याचं काय चाललंय यावर त्यांचे कार्यक्रम चालतात अशी टीका नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली. राज्याचा मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला प्रोटोकोल कळत नाही असेही राणे म्हणाले. मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना बघितले पण नाही आणि हल्ली शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते असे ते म्हणाले.
संजय राऊतांवर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे
नितेश राणेंनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. संजय राऊत यांची भाषा पाकिस्तानचे एजंट असल्यासारखी आहे. अशा लोकांवर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे असे राणे म्हणाले. अजित पवार यांनी किती मोठं समर्थन आहे हे आजच्या दौऱ्यामुळे दिसतं आहे. राष्ट्रवादीचे आमदार अजितदादांना पाठिंबा देतील असेही ते म्हणाले. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या संदर्भात देखील नितेश राणेंना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारले. यावेळी राणे म्हणाले की, आमचं सरकार सर्वांना न्याय देईल. G20मुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे वजन समजणार असल्याचे राणे म्हणाले. भात शेतीच्या नुकसानीबाबत आम्ही अहवाल मागितला आहे. राज्य सरकार म्हणून जी काही मदत करता येईल ती आम्ही करु असे नितेश राणे म्हणाले.
उद्धव ठाकरेंचा जळगाव दौरा, जाहीर सभाही होणार
आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे जळगाव दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते जळगावात छत्रपती शिवाजी महाराज आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंची जाहीर सभा देखील होणार आहे. मात्र त्यापूर्वीच राजकारण तापले असून, राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
Nashik : ‘माय माउलींच्या रक्षणासाठी’! चांदवडमध्ये भाजप नेते नितेश राणे यांच्या नेतृत्वात भव्य जनआक्रोश मोर्चा
[ad_2]