[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Asia’s Biggest Vegetable: दरवेळी आपण भाजी (Vegetable) आणण्यासाठी आपल्या घराच्या जवळ असलेल्या छोट्याशा भाजी मार्केटमध्ये जातो. हे भाजी मार्केट सोडून जास्तीत जास्त तुम्हाला नवी मुंबई एपीएमसी मार्केट, दादर भाजी मार्केट याच जागा माहित असतील. परंतु आशियात एक असं भाजी मार्केट आहे, जिथे जाण्याची इच्छा प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात असते आणि जे आशियातील सर्वात मोठं भाजी मार्केट आहे. योगायोगाने हे भाजी मार्केट भारतातच आहे.
आशियातील सर्वात मोठी भाजी मंडई (Vegetable Market) भारताची राजधानी असलेल्या दिल्लीतील आझादपूरमध्ये आहे. आज आपण त्याच मार्केटबद्दल सविस्तर जाणून घेऊया आणि भारतातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांना तिथे जाऊन व्यवसाय करावासा वाटतो? हे देखील समजून घेऊया.
जवळपास 90 एकरांवर पसरलं आहे हे भाजी मार्केट
भारताच्या राजधानीत असलेल्या या मार्केटचं क्षेत्रफळ अंदाजे 90 एकर आहे. आझादपूर मंडईत गेल्यास सर्वात पहिलं एक मोठं गेट दिसतं. ज्यावर “चौधरी हरी सिंह घाऊक भाजी मंडई आझादपूर” असं लिहिलं आहे. तिथे दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते, कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय होतो. भारत आणि आजूबाजूच्या देशात क्वचितच अशी कोणती तरी भाजी उपलब्ध असेल जी या बाजारात उपलब्ध नसेल.
सर्व वयोगटातील लोक भाजी मार्केटमध्ये कार्यरत
नवी दिल्लीतील या बाजारात तुम्हाला सर्व वयोगटातील मजूर दिसतील. छोटे ते मोठे व्यापारी तिथे व्यवसाय करण्यासाठी येतात. या बाजारात काहींना नफा मिळतो आणि काहीजण डील केल्यानंतर पैसे गमावतात आणि घरी जातात. तुम्हाला या मार्केटमध्ये महिलाही काम करताना दिसतील. जे घरच्या जबाबदाऱ्यांबरोबरच भाजीच्या पोत्यांची ओझी देखील उचलत असतात. या भाजी मार्केटमध्ये सर्व भाज्या अगदी स्वस्त दरात मिळतात. या मार्केटमध्ये सकाळच्या वेळी बरीच गर्दी असते. या मार्केटमध्ये फिरायला एक दिवस देखील कमी पडेल.
1977 मध्ये झाली स्थापना
कृषी उत्पन्न विपणन समिती (APMC) MNI ची स्थापना मंडी समित्यांच्या विविध उपक्रम आणि कल्याणकारी योजनांचं आयोजन, नियंत्रण आणि मार्गदर्शन करण्यासाठी 1977 मध्ये आझादपूर मंडीमध्ये करण्यात आली. मंडी परिषदेने प्रभावीपणे काम करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव देण्यासाठी विविध कायदे केले होते. आज त्या भाजी मार्केटमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या मिळतात.
हेही वाचा:
Facts: जगात आहे एक असं गाणं, जे गाताच माणूस मरतो; यामागची कहाणी नेमकी काय?
[ad_2]