5 People Found Dead Inside House; एकाच कुटुंबातील पाच जणांचा संशयास्पद शेवट

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

थिरुअनंतपुरम: केरळच्या कन्नूर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. चेरुपडामधील एका घरात एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह सापडले आहेत. यामध्ये तीन मुलांचा समावेश आहे. घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ माजली. अनेक जण घराबाहेर जमले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.पोलिसांनी हत्या आणि आत्महत्येच्या अनुषंगानं या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ‘मुलांचे मृतदेह शिडीच्या मदतीनं फासाला लटकलेले होते. तर जोडप्याचा मृतदेह घराच्या छताला लटकलेल्या स्थितीत सापडले,’ अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यानं दिली. मृत मुलांचं वय १२ वर्षांपेक्षा कमी आहे. सूरज, सुरभी आणि सुजीत अशी त्यांची नावं आहेत. तर शाजी आणि स्रिजा असं दाम्पत्याचं नाव आहे.
UPSC Result 2022: दोघींचं नाव, रँक सेम; रोल नंबरही सारखाच, निवड नेमकी कोणाची झाली?
स्रिजाला तीन मुलं पहिल्या लग्नापासून झाली होती. मृत पती-पत्नीचा विवाह १६ महिन्यांपूर्वी झाला होता, अशी माहिती स्रिजाचे शेजारी राहणाऱ्या चेरुवाथुर यांनी दिली. शाजीची एक दुसरी पत्नी असून तिच्यापासून त्याला दोन मुलं आहेत. मृतदेह आढळून आलेलं घर स्रिजाच्या पहिल्या पत्नीचं असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं.

शाजी आणि स्रिजा यांच्यात दररोज वाद व्हायचे. त्याबद्दलच्या अनेक तक्रारी चेरुपुज्हा पोलीस ठाण्यात आहेत. पती, पत्नीनं आधी मुलांना संपवून त्यांचे मृतदेह पंख्याला लटकवले आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली, असा संशय पोलिसांना आहे. फॉरेन्सिक टीमनं घटनास्थळाचा आढावा घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
तुकडे केले न् ॲसिडने जाळले; ताईने धाकटीला निर्घृणपणे संपवले; रात्रीचा प्रश्न जीवावर बेतला
गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीतही केरळमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केली होती. कौटुंबिक वादांना कंटाळून त्यांनी जीवन प्रवास थांबवला. चारही जणांनी भरतपुझा नदीत उडी घेत जीव दिला. आपण आयुष्याची अखेर करण्यासाठी जात असल्याचं त्यांनी नातेवाईकांना सांगितलं होतं. चार मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश होता.

[ad_2]

Related posts