Parvati Valley Mystery Tourist Missing More Than 15 Tourist Missing From Manikaran Know Story Of Mystery Manikaran

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : पर्यटनासाठी हिमाचल प्रदेशला (Himachal Pradesh) अनेक लोकांची पहिली पसंती असते. हिमाचल प्रदेशमध्ये पार्वती व्हॅली (Parvati Valley) हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील निसर्गसौंदर्याची गोष्टच निराळी आहे. निसर्गरम्य सौंदर्यासह पार्वती व्हॅली रहस्यमयी (Parvati Valley Tourist Missing Mystery) कारणासाठीही चर्चेत आहे. पर्यटक गायब झाल्याच्या (Tourist Missing Mystery) बातम्यांमुळे पार्वती व्हॅलीही चर्चेत आहे. गेल्या वर्षीही पार्वती खोऱ्यातून अनेक जण बेपत्ता झाले होते. 2023 मध्ये नवीन वर्षाचं सेलिब्रेशन सुरु असतानाही देखील येथून पर्यटक बेपत्ता झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पार्वती खोऱ्यात असं नेमकं काय घडलं, ज्यामुळे येथून अचानक लोक गायब होऊ लागले आहेत. प्रशासनासमोर हे एक गूढच आहे.

प्रसिद्ध पर्यटनस्थळावरून एकामागून एक पर्यटक गायब

IANS या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, 2022 मध्ये पार्वती खोऱ्यातून 227 पर्यटक बेपत्ता झाले होते. गेल्या 20 वर्षांमध्ये म्हणजेच 2003-2023 पर्यंत पार्वती खोऱ्यातून 1078 लोक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 21 विदेशी पर्यटक आहेत. यापैकी 498 जणांचा शोध लागला आहे, मात्र अद्याप बेपत्ता लोकांची संख्याही मोठी आहे. पार्वती खोऱ्यातून अनेक लोक बेपत्ता होत आहेत. 

पार्वती व्हॅलीतून एकामागून एक पर्यटक बेपत्ता

पार्वती व्हॅलीतून लोक गायब झाल्यामुळे या ठिकाणाला आता ‘व्हॅली ऑफ डेथ’ असं म्हटलं जात आहे. पण, असं असलं तरीही येथे भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मात्र, सातत्याने वाढत आहे. पार्वती व्हॅलीमध्ये देशी अन् परदेशी पर्यटकही मोठ्या संख्येना दाखल होत आहेत. दरम्यान, येथून लोक बेपत्ता होण्यामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण, या भीतीमुळे या पर्यटनस्थळाची प्रसिद्धी काही कमी झालेली नाही.

पार्वती व्हॅलीतून लोक बेपत्ता होण्यामागचं रहस्य काय?

पार्वती व्हॅलीतून अनेक लोक बेपत्ता होण्याचा संबंध ड्रग्सशी जोडण्यात येत आहे. देवभूमी पार्वती व्हॅली आता ड्रग्जच्या विळख्यात येत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. मलानासारख्या ड्रग्जमुळे अनेक पर्यटक या भागात येत असून त्याचा व्यवसाय सातत्याने वाढत आहे. ड्रग्जमुळे बेपत्ता होण्याच्या घटना वाढत असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, याला आळा घालण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून अनेक पावलं उचलली जात आहेत. मात्र, लोक बेपत्ता होण्याचे नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. अशा परिस्थितीत बेपत्ता होण्याच्या या घटना गूढ मानल्या जात असून त्यासाठी वेगवेगळी कारणं दिली जात आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

[ad_2]

Related posts