[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>रोहित शर्माच्या भारतीय संघानं आशिया चषकातल्या सुपर फोर सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी ५० षटकांत ३५७ धावांचं तगडं आव्हान दिलं आहे. भारताच्या विराट कोहली आणि लोकेश राहुल या आदल्या दिवशीच्या दोन्ही नाबाद फलंदाजांनी शतकं झळकावली. त्यामुळं भारतानं २४ षटकं आणि एका चेंडूतल्या दोन बाद १४७ धावांवरून ५० षटकात दोन बाद ३५६ धावांचा डोंगर उभारला. विराट कोहलीनं वन डे कारकीर्दीतलं सत्तेचाळीसावं, तर लोकेश राहुलनं वन डे कारकीर्दीतलं सहावं शतक झळकावलं. विराटनं वन डे कारकीर्दीतला १३ हजार धावांचा टप्पाही पार केला. त्यानं ९४ चेंडूंत नाबाद १२२ धावांची खेळी उभारली. लोकेश राहुलनं १०६ चेंडूंत नाबाद १११ धावांची खेळी केली. त्या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी २३३ धावांची अभेद्य भागीदारी रचली.</p>
[ad_2]