( प्रगत भारत । pragatbharat.com)
Shanti Swarup Bhatnagar Award : शांती स्वरूप भटनागर पुरस्कारांची (Shanti Swarup Bhatnagar Award) घोषणा झाली आहे. देशातील 12 तरुण शास्त्रज्ञांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (CSIR) वर्ष 2022 साठी शांती स्वरूप भटनागर पुरस्कारांची घोषणा केली आहे. हा पुरस्कार दरवर्षी ४५ वर्षांखालील शास्त्रज्ञांना दिला जातो. यामध्ये पाच लाख रुपयांचे पारितोषिक आणि सन्मानपत्र देण्यात येणार आहे.
CSIR चे पहिले महासंचालक शांती स्वरूप भटनागर यांच्या नावाने दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. दरवर्षी सात वैज्ञानिक विषयांमध्ये हे पुरस्कार दिले जातात. यामध्ये जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी आणि पृथ्वी (महासागर आणि ग्रह विज्ञान) या अंतर्गत उत्कृष्ट संशोधकांना हे पुरस्कार दिले जातात.