[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई : इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक आज दिल्लीत पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित राहणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये ओबीसी समाजाकडून आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मोर्चा काढण्यात येणार आहे.
इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत जागावाटपाच्या सूत्रावर चर्चा होणार असल्याची शक्यता आहे.
भाजपच्या केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठ होणार आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी एल संतोष आणि भाजप सीईसीचे इतर सदस्यही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ओबीसी समाजाचा मोर्चा
राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असतानाच दुसरीकडे आता ओबीसी मोर्चा काढण्यात येणार आहे. ओबीसमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध होत असून, ओबीसी समन्वय समिती आजपासून अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये हे आंदोलन करण्यात येणार आहे.
बुलढाण्यात मराठा समाजाचा मोर्चा
जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज सकल मराठा समाजाकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात महाविद्यालयीन तरुण तरीण मार्गदर्शन आणि आपली भूमिका मांडणार आहेत.
पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक
पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 36 संघटनांच्या समन्वय समितीच्या बैठकीला सुरुवात होणार आहे. या बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
अहमदनगरमध्ये रास्ता रोको
जालना येथील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आणि मराठा समाजाला 50 टक्के आरक्षण देण्यासाठी अहमदनगरमध्ये रास्ता रोको करण्यात येणार आहे. मराठा समाजाच्या वतीने नगर-पुणे रोडवर हे रास्तारोको करण्यात येईल.
सतीश उके यांच्या जामीन अर्जावर सुनावणी
नागपूरचे वकील सतीश उके यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं उकेंना अटक केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत सतीश उके यांनी कोट्यावधी रुपयांच्या बनावट स्टॅम्प घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी याआधी नागपूर न्यायालयातही रितसर अर्ज केला होता.
[ad_2]