New Parliament Building First Look Video Interior New Parliament House Delhi View – Watch

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Parliament Video: भारतीय संसदेच्या नव्या इमारतीचे (New Parliament Building) उद्घाटन येत्या 28 मे रोजी पार पडणार आहे. संसदेच्या या नव्या इमारतीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल, असे पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी ट्वीट करून म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत नव्या संसदेच्या इमारतीचे अंतरंग उलगडून दाखवणारा व्हीडिओ शेअर केला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत म्हटले की, नवीन संसद भवनाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल. हा व्हिडिओ या प्रतिष्ठित इमारतीची झलक देत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले. यावेळी त्यांनी नागरिकांना आवाहन केले. त्यांनी म्हटले की, नव्या संसद भवनाचा  हा व्हिडिओ तुमच्या स्वतःच्या व्हॉइस-ओव्हरने शेअर करा. यातून तुमचे विचार व्यक्त होतील. मी त्यापैकी काही री-ट्विट करणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले. 

कशी आहे ही नवी इमारत?

ही संसदेची नवी इमारत चार मजली आहे तर या संसदेला सहा प्रवेशद्वार आहेत. या संसद भवनात लोकसभेचे एक हजार आणि राज्यसभेचे जवळपास 400 खासदार बसू शकतील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. नव्या संसद भवनात प्रत्येकासमोर छोटे बाक असतील. तसेच या बाकांमध्ये हजेरी,मतदान तसेच भाषांतर ऐकण्यासाठी आत्याधुनिक सुविधा असतील. याशिवाय या संसद भवनात 120 कार्यालयं आणि म्युझियम तसेच गॅलरीही असतील. 

 

news reels Reels

विरोधकांचा उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार

संसद ही देशातील सर्वोच्च वास्तू आहे. भारताचे राष्ट्रपती देशाचे प्रमुख, संविधानाचे प्रमुख आहेत. असे असतानादेखील संसद भवनाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाला त्यांना डावलून पंतप्रधानांनी स्वत: उद्घाटन करणे योग्य नाही, अशी भूमिका विरोधी बाकांवरील जवळपास 20 राजकीय पक्षांनी घेतली आहे. या इमारतीच्या भूमिपूजनाच्यावेळीदेखील  तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आमंत्रण देण्यात आले नव्हते. तर, आता इमारतीच्या उद्घाटनालाही देखील विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना डावलणे चुकीचे असल्याचे विरोधी पक्षांनी म्हटले. 

संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर 20 राजकीय पक्षांनी बहिष्कार घातला आहे. यामध्ये काँग्रेस, TMC,DMK, JDU, आप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), माकप, समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय जनता दल या मोठ्या पक्षांचा समावेश आहे. 



[ad_2]

Related posts