अमेरिकेत पोलीस कर्मचाऱ्याने भारतीय विद्यार्थिनीला कारने उडवले; मृत्यूनंतर सैतानासारखा हसला

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Crime News : अमेरिकेत (america) पोलिसांच्या गाडीची धडक बसल्याने एका भारतीय विद्यार्थ्यीनीच्या मृत्यूबाबतचा व्हिडीओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. भारतीय तरुणीला धडक बसल्यानंतरचा व्हिडीओ पोलिसांच्या अंगावर लावण्यात आलेल्या बॉडी कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला होता. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. पोलिसांकडून सध्या बॉडी कॅमेऱ्याचे फुटेज तपासले जात आहे. या फुटेजमध्ये विद्यार्थ्यीनीला दिल्यानंतर पोलिस अधिकारी फोन कॉलवर हसताना आणि विनोद करताना दिसत आहे. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे. भारताकडून या विद्यार्थ्यानीच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

अमेरिकेच्या साउथ लेक युनियनमधील नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असलेल्या 23 वर्षीय जान्हवी कंदुला (Jaahnavi Kandula) या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. 23 जानेवारी रोजी डेक्सटर अव्हेन्यू नॉर्थ इथल्या थॉमस स्ट्रीटजवळून चालत असताना सिएटल पोलिसांच्या वाहनाने जान्हवीला जोरदार धडक दिली होता. या धडकेत जान्हवीचा मृत्यू झाला होता. जान्हवीच्या मृत्यूनंतर अमेरिकेतील भारतीय दूतावासाने सिएटल आणि वॉशिंग्टन येथील स्थानिक अधिकारी तसेच बायडेन प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी केली होती.

सिएटलचा पोलीस अधिकारी डॅनियल ऑर्डरर हा जान्हवीला धडक देणाऱ्या गाडीत बसला होता. त्याच्या बॉडी कॅमेरा व्हिडिओमध्ये, इंजिनमधून मोठा आवाज ऐकू येत होता कारण त्याच्या गाडीचा वेग 74 किमी प्रतितास इतका होता. जान्हवी थॉमस स्ट्रीटजवळ चालत असताना तिला डॅनियल ऑर्डररच्या वाहनाने धडक दिली होती. या धडकेनंतर जान्हवी 100 फूट लांब उडून पडली होती. त्यानंतर तिला हार्बरव्ह्यू मेडिकल सेंटरमध्ये नेण्यात आले, जिथे तिचा मृत्यू झाला. व्हिडिओ फुटेजमध्ये एक पोलीस अधिकारी जान्हवीला सीपीआर देत असल्याचे दिसत होते.

दुसर्‍या बॉडीकॅम फुटेजमध्ये डॅनियल ऑर्डरर सांगितले की, मी हॉर्न वाजवत असताना ती मुलगी क्रॉसवॉकवर होती आणि तिने मला पाहताच क्रॉसवॉकवरून पळायला सुरुवात केली ज्यामुळे हा अपघात झाला. या घटनेनंतर मी अस्वस्थ झालो होतो असे डॅनियल ऑर्डरर फोन कॉलवर सांगत होता.

दुसरीकडे, अमेरिकेतील एका वृत्तवाहिनीने बुधवारी दिलेल्या वृत्तानुसार, सिएटल पोलिसांनी जारी केलेल्या व्हिडीओनुसार, डॅनियल ऑर्डरर हा त्यादिवशी गाडी चालवत होता. अपघातानंतर तो माईक सोलन यांच्याशी कॉलवर बोलत होता. फुटेजमध्ये ‘तिची किंमत जास्त नव्हती, असे डॅनियल ऑर्डरर बोलताना ऐकू येत आहे. ती (जान्हवी) मेली आहे म्हटल्यावर डॅनियल लगेच हसला आणि  ‘ती एक नियमित व्यक्ती होती. फक्त 11,000 डॉलरचा चेक लिहा. ती 26 वर्षांचीच होती, तिची किंमत फारशी नव्हती, असे म्हणू लागला. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर भारतीयांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Related posts