Congress Criticized On Modi Government 9 Years Sharp Attack Over Issues Of China Unemployment Adani And Corruption

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Congress on Modi Government 9 Years: मोदी सरकारला सत्तेत येऊन 9 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून अर्थव्यवस्थेपासून बेरोजगारीपर्यंत 9 प्रश्न विचारण्यात आले आहेत. मोदींनी सामाजिक बांधिलकी मोडून काढल्याचा घणाघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. चव्हाण यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेताना मोदी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाबून नवीन संसद भवन बांधलं आहे. त्याची गरज होती का हा देखील प्रश्न आहे? आम्ही बहिष्कार टाकण्याचे कारण म्हणजे मोदी यांनी राष्ट्रपती यांना बोलावलं नाही. स्वतःच्या हाताने स्वतःचा राज्याभिषेक करून घेत आहेत, असं दिसतं. राष्ट्रपती यांचा अपमान आम्ही सहन सहन करणार नसल्याचे म्हणाले.

यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारला 9 प्रश्न विचारले 

अर्थव्यवस्था 

  • देशात महागाई आणि बेरोजगारी गगनाला भिडणारी अर्थव्यवस्था अशी का आहे? श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब का झाले आहेत? सार्वजनिक मालमत्ता मोदींच्या मित्रांना का विकल्या जात आहेत? आर्थिक विषमता का वाढत आहे?

शेती आणि शेतकरी 

  • गेल्या 9 वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट का झाले नाही? कृषी कायदे रद्द करताना शेतकरी संघटनांसोबत केलेले करार अद्याप का लागू केले नाहीत? एमएसपीची हमी का दिली नाही?

भ्रष्टाचार / मित्रवाद 

  • अदानींच्या फायद्यासाठी एलआयसी आणि एसबीआयमध्ये जमा केलेला लोकांचा कष्टाचा पैसा धोक्यात का घालण्यात आला? भ्रष्टाचार संपवण्याच्या गप्पा मारणारे पंतप्रधान अदानींच्या बनावट कंपन्यांमध्ये 20 हजार कोटी कुणाकडे आहेत याचे उत्तर का देत नाहीत?

चीन आणि राष्ट्रीय सुरक्षा 

  • चीनला डोळे वटारण्याची भाषा करणार्‍या पंतप्रधानांनी 2020 मध्ये चीनला क्लीन चिट दिली, तरीही चीनने आमची भूमी काबीज केली आहे, अशी चीन आणि राष्ट्रीय सुरक्षा का आहे?

सामाजिक सलोखा 

  • निवडणुकीच्या फायद्यासाठी जाणीवपूर्वक फुटीरतावादी राजकारणाला खतपाणी घालून समाजात भीतीचे वातावरण का निर्माण केले जात आहे?

सामाजिक न्याय 

  • महिला, दलित, एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्यांक यांच्यावरील अत्याचारावर पंतप्रधान गप्प का बसतात असा सामाजिक न्याय? जातीय जनगणनेच्या मागणीकडे दुर्लक्ष का करत आहे?

घटनात्मक संस्था

  • घटनात्मक संस्थांकडून विरोधी पक्ष आणि नेत्यांवर सूडाच्या भावनेने कारवाया का केल्या जात आहेत? जनतेने निवडून दिलेल्या विरोधी पक्षांची अनेक सरकारे का पाडली गेली? गेल्या 9 वर्षात घटनात्मक आणि लोकशाही संस्था कमकुवत का झाल्या?

लोककल्याणकारी योजना 

  • लोककल्याणकारी योजना बजेटमध्ये कपात करून मनरेगासारख्या लोककल्याणकारी योजना कमकुवत का झाल्या? गरीब, आदिवासी, गरजूंच्या स्वप्नांचा चुराडा का होत आहे?

कोरोना गैरव्यवस्थान

  • कोरोनामुळे 40 लाख लोकांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई नाकारली गेली, असा कोरोनाचा गैरव्यवस्थापन का आहे? अचानक लॉकडाऊन करून लाखो कामगारांना घरी जाण्यास भाग का पाडले गेले?

इतर महत्वाच्या बातम्या 

[ad_2]

Related posts