Maharashtra News Dcm Ajit Pawar Criticizes Opposition Parties In Pune 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ajit Pawar : आमच्या विरोधकांना उकळ्या फुटतात आणि ते काहीपण चुकीच्या बातम्या पसरवतात असं म्हणत अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधी पक्षांवर टीका केली. कारण नसताना मला ट्रोल केलं जात आहे. कंत्राटी भरतीच्या संदर्भात अजित पवार यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला होता, त्यावेळी ते बोलत होते. सध्या राज्यात वेगवेगळ्या विभागात 1 लाख 50 हजार मुला मुलींची भरती चालू आहे. पण विरोधक चुकीच्या अफवा पसरवत असल्याचे अजित पवार म्हणाले. ते सकाळी पुण्यात (Pune) प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

वेगवेगळ्या विभागात 1 लाख 50 हजार मुला मुलींची भरती चालू

मी काल आरोग्य विभागाचा आढावा घेत होतो. अनेक ठिकाणी स्टाफ कमी आहे. तो स्टाफ भरण्याची प्रक्रिया चालू असल्याचे अजित पवार म्हणाले. शिक्षण विभागातही भरती करणार आहोत. ज्या ठिकाणी शिक्षकांची गरज आहे, तया ठिकाणी निवृत्त झालेल्या शिक्षकांना आपण तात्पुरते घेतल्याचे अजित पवार म्हणाले. भरती तात्काळ करावी लागते नाहीतर काही जण लगेच कोर्टात जातात असे अजित पवार म्हणाले. सध्या विरोधक कारण नसताना आम्हाला बदनाम करण्याचं काम करत असल्याचे अजित पवार म्हणाले. आपण वेगवेगळ्या विभागात 1 लाख 50 हजार मुला मुलींची भरती करणार आहोत. ही सघळ्यात मोठी भरती असणार आहे. आत्तापर्यंत एवढी मोठी भरती कोणत्याही सरकारच्या काळात झाली नव्हती असे अजित पवार म्हणाले.  

छत्रपती संभाजीनगरमधील बैठकीत महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार

आज आणि उद्या मंत्रीमंडळासह अधिकारी वर्ग छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. मी आज संध्याकाळी संभाजीनगरमध्ये जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. त्या ठिकाणी काही महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. मराठवाड्यातील जे आठ जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांच्या विकासाच्या संदर्भात चर्चा होणार आहे. मराठवाड्यात पावसानं चांगलीच ओढ दिली आहे. अनेक भागात शेतकऱ्यांची पिकं करपून गेली आहेत.  राज्यातही काही भागात अशी स्थिती आहे. ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, तिथं स्थिती चांगली आहे. हवामान विभागानं आणखी चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची यासंदर्भात देखील प्रसारमाध्यमांनी अजित पवार यांना प्रश्न विचारले. यावेळी अजित पवार म्हणाले की, निवडणूक आयोगासमोर आम्ही आमची बाजू मांडणार आहोत. ज्यांना बोलावलं ते जाणार आहोत. आमची बाजू कशी उजवी हे आम्ही सांगणार असल्याचे अजित पवार म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

Pune : शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार? आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी मंडळाची बैठक

 

[ad_2]

Related posts