Farmer Two Acres Of Lemon Orchards Were Removed For Due To Lack Of Rain In Karmala Solapur

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Agriculture News : पावसानं दडी मारल्यानं राज्यातील शेतकरी (Farmers) चिंतेत आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जात आहेत. त्यामुळं सध्या शेतकरी पावसाची वाट भगत आहेत. सोलापूर (Solapur) जिल्ह्यात देखील अशीच स्थिती आहे. जिल्ह्यातील करमाळा (Karmala) तालुक्यातील पोथरे गावातील एका शेतकऱ्यानं  पाऊस पडत नसल्यामुळं आपली दोन एकर लिंबाची बाग (lemon orchard) उपटून पेटवून दिली आहे. पाऊस नसल्यानं लिंबाची बाग जळू लागल्यानं शेतकऱ्यानं बाग उपटून टाकली आहे. 

पाणी नसल्यानं लिंबाची बाग सांभाळणं कठीण 

करमाळा तालुक्यातील पोथरे येथील शेतकरी शहाजी झिंजाडे यांनी आरली दोन एकर लिंबाची बाग उपटून पेटवून दिली आहे. पावसानं पाठ फिरवल्यानं डोळ्यादेखत त्यांची लिंबची बाग जळू लागल्याने त्यांनी हतबल होऊन हा निर्णय घेतला. लांबलेला पाऊस आणि कमी झालेली पाणी पातळी यामुळं लिंबाची बाग सांभाळणं कठीण झाले आहे. त्यामुळं हा मार्ग स्वीकारला असल्याची व्यथा  शहाजी झिंजाडे यांनी सांगितली. लिंबोणीला आतापर्यत कधीही नुकसान भरपाईची मदत मिळाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. 

बागेला फळं लागताच पाणी कमी पडले

झिंजाडे यांच्याकडे दोन एकर लिंबोणीची बाग होती. त्यांच्याकडे दोन बोअर, कान्होळा नदीवरून पाईपलाईन तसेच विहिरी आहे. मात्र, त्याला पाणीच नाही. 2012 मध्ये त्यांनी या बागेची लागवड केली होती. मात्र, नेमकी बागेला फळं लागताच पाणी कमी पडले. त्यामुळं हतबल होऊन शहाजी झिंजाडे यांनी लिंबाची झाडे तोडून पेटवून दिली आहेत. लिंबाची बाग जगवण्यासाठी झिंजाडे यांनी आधी टॅंकरने देखीली पाणी घातले होते. मात्र, आता टॅंकरने पाणी घालण्याची परिस्थिती राहिली नाही. त्यामुळं हा निणर्य घेतला असल्याची व्यथा शेतकरी शहाजी झिंजाडे यांनी सांगितली. 

राज्यातील बहुतांश भागात पावसाची ओढ

सध्या राज्यातील बहुतांश भागात पावसानदडी मारली आहे. तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. खरीपाची पिकं वाचवण्यासाठी राज्यातील शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याअभावी मोठा फटका बसला आहे. तूर, सोयाबीन, मका, कांदा, फळबागा इत्यादी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मागील महिन्यात पावसाचा 21 दिवसापेक्षा अधिक खंड पडलल्यानंतर चालू सप्टेंबर महिन्यात देखील पावसानं चांगलीच ओढ दिली आहे. त्यामुळं पिकांना मोठा फटका बसला आहे. काही भागात पिकांचे नुकसान हे 50 टक्यांहून अधिक असल्याचं समोर आलं आहे. तर काही भागात शेतकऱ्यांची पिकं वाया गेली आहेत. याच पार्श्वभूमीवर नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Rain : राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ भागात पावसाचा जोर वाढणार

[ad_2]

Related posts