Shocking News american airlines staff says Sorry you smell bad to yahudi family then out of the flight

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shocking News : विमानामध्ये (Flight) प्रवाशांमध्ये काही कारणावरुन वाद होताना दिसतात. हे वाद कधीकधी हाणामारीपर्यंत देखील पोहोचतात. मात्र एका विचित्र घटनेत तक्रारीनंतर एका जोडप्याला त्यांच्या चिमुकल्या मुलीसह खाली उतरवण्यात आलं आहे. या घटनेनंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे या जोडप्याने विमान कंपनीविरोधात (american airlines) तक्रार केली आहे. विमान कंपनीने विचित्र कारण देऊन या जोडप्याला खाली उतरवलं होतं. खाली उतरवण्याचे कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.

अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानात हा सगळा प्रकार घडला आहे. या जोडप्याला तुमच्या अंगातून घाण वास (smell) येतोय असे सांगून त्यांना खाली उतरवण्यात आलं होतं. खाली उतरवण्याचे कारण ऐकून कुटुंबाला सुरुवातीला काहीच कळालं नाही. त्यानंतर मात्र त्यांनी विमान कंपनीविरोधात तक्रार केली आहे. अपमानित झालेल्या जोडप्याने अमेरिकन एअरलाइन्सविरुद्ध खटला दाखल केला आहे. कंपनीच्या या कृतीमुळे आपल्याला असह्य अपमान, मानसिक आणि भावनिक त्रासाला सामोरं जावं लागलं असे जोडप्याने म्हटलं आहे.

योसेफ अॅडलर आणि जेनी अॅडलर या जोडप्यासोबत हा सगळा प्रकार घडला आहे. विमानातून खाली उतरवल्यानंतर त्यांना असह्य अपमान सहन करावा लागल्याचे अॅडलर कुटुंबियांनी सांगितले. योसेफ अॅडलर आणि त्यांची पत्नी जेनी यांच्या म्हणण्यानुसार, मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कर्मचार्‍यांनी त्यांना आणि त्यांच्या 19 महिन्यांच्या मुलीला विमानातून बाहेर काढले आणि सांगितले की तुमच्या अंगाला वास येत असल्यामुळे तुम्ही आमच्यासोबत येऊ शकत नाही.

हे जोडपे  विमानात चढत असताना एका विमानातील कर्मचाऱ्यांना सांगितले, “सर, तुम्हाला विमानातून खाली उतरावं लागणार आहे. बाहेर असताना जात असताना पायलटने शरीराच्या दुर्गंधीमुळे कुटुंबाला विमानातून काढून टाकत असल्याचे कर्मचाऱ्याने अॅडलर यांना सांगितले होते. त्यावेळी पुन्हा योसेफ अॅडलर यांनी माझ्यातून की पत्नीतून वास येतो असे कर्मचाऱ्याला विचारले. मात्र कर्मचाऱ्याने पायलटने असे सांगितले आहे म्हणत त्यांना खाली उतरवले. 

‘त्यांनी आम्हाला बाहेर काढताच विमानाचे दरवाजे बंद केले आणि सांगितले की, माफ करा सर आम्हाला काही लोकांनी तक्रार केली आहे की, तुमच्या अंगातून वास येत आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला विमानात बसू देऊ शकत नाही,’ असे योसेफ अॅडलर यांनी सांगितले. त्यानंतर आम्ही विमानतळावरील लोकांना थांबवून आमच्या अंगाचा वास येत आहे का असे विचारत होतो. मात्र त्यांनी याबाबत नकार दिला, असेही योसेफ अॅडलर म्हणाले.

विमानातून उतरवल्यानंतर त्यांना सांगितले गेले तुमचे सामान परत केले जाईल, पण तसे झाले नाही. अॅडलर कुटुंबियांकडे फक्त त्यांनी घातलेले कपडे राहिले. कार सीट आणि स्ट्रॉलरसह त्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी त्यांना आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट विमानातच राहिली होती. वारंवार मागणी करुनही त्यांनी याबाबत योग्य उत्तर मिळालं नाही.

दरम्यान, योसेफ अॅडलर  यांनी एअरलाइन कर्मचाऱ्यांना सांगितले की आम्ही त्या दिवशी सकाळच्या फ्लाइटच्या आधी आंघोळ केली होती. या घटनेनंतर कंपनीने त्यांची रात्री हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आणि जेवणाचे व्हाउचर देण्यात आले. नंतर जोडप्याला दुसऱ्या फ्लाइटमध्ये जागा देण्यात आली. 

Related posts