Chief Minister Eknath Shinde Will Visit Chhatrapati Sambhajinagar For Two Days From Today ​

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chhatrapati Sambhajinagar : आज छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळं आजपासून दोन दिवस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) संभाजीनगरमध्ये असणार आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री आज संभाजीनगरमध्येच मुक्काम करणार आहेत. आज दिवसभर मंत्रिमंडळ आणि विविध विकास कामांच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री हजेरी लावतील. उद्या (17 सप्टेंबर) मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त त्यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे दिल्लीकडे रवाना होतील.

असा असेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दौरा?

आज सकाळी 8 वाजून 45 मिनीटांनी मुख्यमंत्र्यांचे औरंगाबाद विमानतळ येथे आगमन, त्यानंतर मोटारीनं जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबादकडे प्रयाण
सकाळी 9 वाजता औरंगाबाद शहरातील विविध प्रकल्प इमारतींचे ऑनलाईन भूमीपुजन / लोकार्पण कार्यक्रम –
1) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे ई भूमीपुजन,
2) सातारा व देवळाई परिसरातील मलनि:स्सारण योजनांचे ई भूमीपुजन,
3) महसूल येथील घनकचरा प्रक्रिया केंद्राचे ई लोकार्पण.
4) सांस्कृतिक कार्य विभागामार्फत कॉफी टेबल बुक, गॅझेटियर, डॉक्युड्रामा फिल्म व पोस्टल कव्हर विमोचन
5) औरंगाबाद जिल्ह्याच्या भविष्यातील वाटचाल व प्रगतीबाबत मंथन बैठक,
स्थळ:- वंदे मातरम सभागृह.
सकाळी 10.40 वाजता मोटारीने स्मार्ट सिटी कार्यालय, औरंगाबादकडे प्रयाण.

सकाळी 10.40 वाजता स्मार्ट सिटी कार्यालय, औरंगाबाद येथे आगमन
सकाळी 10.50 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पण स्थळ: स्मार्ट सिटी कार्यालय.
सकाळी 10:55 वाजता छत्रपती संभाजीनगर जिल्हा / विभाग / तालुका नामकरण बोर्डाचे अनावरण.स्थळ: स्मार्ट सिटी कार्यालय.
दुपारी 11 वा.राज्य मंत्रीमंडळ बैठक.
स्थळ:- स्मार्ट सिटी कार्यालय. मंत्रीमंडळ
बैठकीनंतर लातूर येथील शासकीय निवासी शाळेच्या शासकीय वसतिगृह इमारतीचे ऑनलाईन उद्घाटन, स्थळ:- स्मार्ट सिटी कार्यालय.
दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद स्थळ :- अण्णाभाऊ साठे रिसर्च सेंटर, स्मार्ट सिटी कार्यालय जवळ.
दुपारी ३ वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृह, औरंगाबादकडे प्रयाण.
दुपारी 3.15 वा.शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथे आगमन व राखीव.
सायं. 5 वा. मोटारीने गॅलॅक्सी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय, अग्नीहोत्र चौक, ज्योतीनगर, औरंगाबादकडे प्रयाण.
सायं. 5.15 वा.गॅलॅक्सी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन.
स्थळ:- चेतक घोडा जवळ, अग्नीहोत्र चौक, ज्योतीनगर, औरंगाबाद.
सायं. 5.30 वा.मोटारीने निराला बाजार, औरंगाबादकडे प्रयाण.
सायं. 5.40 वा.गणेश महासंघ कार्यालयाचे उद्घाटन.
स्थळ:- निराला बाजार, औरंगाबाद.
सायं. 5.50 वा.मोटारीने शासकीय विश्रामगृह, औरंगाबादकडे प्रयाण.
सायं. 6 वा.शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.
रात्री 8.20 वा.मोटारीने क्रांती चौक, औरंगाबादकडे प्रयाण.
रात्री 8.30 वा.’गर्जा मराठवाडा’ कार्यक्रमास उपस्थिती.स्थळ:- क्रांती चौक, औरंगाबाद.
सोयीनुसार मोटारीने शासकीय विश्रामगृह, औरंगाबादकडे प्रयाण.शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथे आगमन, राखीव व मुक्काम.

असा असेल उद्याचा मुख्यमंत्र्यांचा दौरा

रविवार, दि. 17 सप्टेंबर रोजी सकाळी 8.45 वा.मोटारीने सिध्दार्थ उद्यान, औरंगाबादकडे प्रयाण.
सकाळी 9 वा.मराठवाडा मुक्तिसंग्राम ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम.
स्थळ:- सिध्दार्थ उद्यान, औरंगाबाद
सकाळी 9.30 वाजता मराठवाडा मुक्तिसंग्राम चित्रप्रदर्शनीस भेट.
स्थळ :- सिध्दार्थ उद्यान, औरंगाबाद,
सकाळी 9.45 वा.ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक लाला लक्ष्मीनारायण मोहनलाल जैस्वाल यांच्या तैलचित्राचे अनावरण.
स्थळ:- सिध्दार्थ उद्यान, औरंगाबाद.
सकाळी 10 वा.मोटारीने शासकीय विश्रामगृह, औरंगाबादकडे प्रयाण.
सकाळी 10.15 वा.शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथे आगमन व राखीव 
दुपारी 1.30 वा.मोटारीने औरंगाबाद विमानतळाकडे प्रयाण.
दुपारी 2 वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने श्रीनगर, जम्मू-कश्मिरकडे प्रयाण.

महत्त्वाच्या बातम्या:

ABP Majha Impact : टीकेनंतर मुख्यमंत्र्यांनी सोडलं ते आलिशान हॉटेल आणि तामझाम; शिंदेंचा मुक्काम आता फाईव्ह स्टार हॉटेलमधून शासकीय विश्रामगृहात

[ad_2]

Related posts