( प्रगत भारत । pragatbharat.com)
Trending Video : विश्वास, प्रेम आणि लग्नाच्या पवित्र नात्याला तडा देणारी एक घटना समोर आली आहे. बायकोने नवऱ्याला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहात (Extra Marital Affair) पडकलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. झालं असं की, मुलीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं की, त्यांनी मुलीचं लग्न 28 नोव्हेंबर 2021 ला नोएडातील नागला उदारम (Uttar Pradesh news) इथल्या पुनीत नगर याच्याशी लावून दिलं होतं.लग्न साधेसुधे नव्हते कारण या नवरदेवाने मुलीच्या वडिलांकडून गडगंज हुंडा घेतला होता. (Greater Noida)
या महाशयाने लग्नात 30 लाखांची कार, 1 किलो सोनं आणि इतर वस्तूही हुंडा घ्या मुलीच्या वडिलांकडून घेतला. पुनीतच्या कुटुंबीयांनी सांगितलं होतं की, आम्ही सध्या यमुनापुरममधील बुलंदशहरात राहतो. पण काही दिवसांनी आम्ही ग्रेटर नोएडामध्ये शिफ्ट होणार आहे. (Trending News wife caught her husband with girlfriend in room noida video viral on Social media)
पण लग्नानंतर चित्र पार बदलं, मुलाकडले लोक जे बोलले त्याविरोधात सगळं घडत होतं. पुनीतने लग्नानंतर पत्नीचा छळ करायला सुरु केली आणि तिच्यासोबत गैरवर्तन करत होता, असा मुलीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं. आम्ही पुनीतला अनेक वेळा या प्रकरणी समज दिली आणि समजवलं पण तो काही सुधारण्यास तयार नव्हता.
मात्र 6 महिन्यांपूर्वी पुनीतने पत्नीला माहेरी सोडलं आणि त्यानंतरही तिला विचारलंच नाही. वडील देशराज म्हणाले की, आम्ही अनेकदा प्रयत्न केला पण मुलीच्या सासरकडून कोणीही तिला घ्यायला आलं नाही. अखेर आमचा संशय बळावला, की या पुनीतचं काही तरी चाललं आहे. आम्ही त्याची माहिती गोळा करण्यास सुरु केली. तेव्हा कळलं की, पुनीतचं एका मुलीसोबत अनैतिक संबंध असल्याचं समोर आली. त्यानंतर आम्ही पुनीतवर पाळत ठेवून होतो.
मुलीच्या वडिलांनी सांगितलं की, पुनीत ऑफिसला सांगून भलतीचकडे जात होता. एकदा आम्ही त्याचा पाठलाग केला. तो सुपरटेक इको व्हिलेज 2 सोसायटीमधील एका प्लॅटमध्ये गर्लफ्रेंडसोबत रासलीला करत होता. त्यावेळी पोलिसांनी घेऊन त्यांनी ते घर गाठलं असता पुनीत त्या मुलीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत सापडला. पुनीतला दुसऱ्या मुलीसोबत पाहून माझ्या मुलीचा राग अनावर झाला आणि तिने पुनीतला मारण्यास सुरुवात केली.
ग्रेटर नोएडा में एक मामला ऐसा भी :
बीवी ने पति को दूसरी महिला के साथ रंगरेलियां मनाते पकड़ा, चांटा लगाकर… Video viral @noidapolice #GreaterNoida pic.twitter.com/iaXfyavwWV
— Tricity Today (@tricitytoday) September 14, 2023
दरम्यान बिसरख पोलीस ठाण्यात पुनीतविरोधात पत्नीने तक्रार दाखल केली आहे. विवाहित असून पत्नीची फसवणूक केल्या प्रकरणी त्याची चौकशी करण्यात येत असल्याचा पोलिसांनी सांगितलं आहे.