Prime Minister Narendra Modi Will Start The PM Vishwakarma Scheme Today

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज (17 सप्टेंबर 2023) नवी दिल्लीत ‘पीएम-विश्वकर्मा’ (PM Vishwakarma scheme) या केंद्रीय क्षेत्र योजनेचा प्रारंभ करण्यात येणार आहे.  पारंपारिक कारागीर आणि हस्तकलेतील निपुण कारागिरांना ओळख आणि सर्वांगीण मदत करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता, निर्मिती आणि व्याप्ती वाढवणं, त्यांना एमएसएमई मूल्य साखळींमध्ये सामावून घेणं हा या योजनेचा उद्देश आहे.

देशाच्या विविध भागांमध्ये 70 ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन

संपूर्ण सरकार या  दृष्टिकोनांतर्गत,  लाभार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती करण्यासाठी आज देशाच्या विविध भागांमध्ये सुमारे 70 ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. केंद्रीय मत्स्यउद्योग, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री परुषोत्तम रुपाला हे आज कर्नाटकमधील मंगळूर येथे मत्स्यउद्योग , पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या वतीने आयोजित ऐतिहासिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भारतात कला आणि हस्तकला यांचे विविध प्रकार असून ती प्राचीन आहे आणि  मूल्ये आणि श्रद्धा याबाबतीत  समृद्ध आहेत. पारंपारिक कारागीर आणि कलाकारांना परंपरेनुसार ‘विश्वकर्मा’ म्हणून संबोधले जाते. ते कलात्मक क्षमतेने काम करतात, पारंपरिक साधने आणि तंत्रे वापरुन आपल्या हातांनी वस्तू साकारतात. विश्वकर्मा हे या देशाचे निर्माते आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळानं 16 ऑगस्ट 2023 रोजी संपूर्ण भारतात ‘पीएम  विश्वकर्मा योजना’ नावाची नवीन योजना लागू करायला  मान्यता दिली होती. हा पारंपारिक कारागीर आणि कलाकारांसाठी एक दूरदर्शी निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेंतर्गत ‘या’ 18 पारंपारिक व्यवसायांचा समावेश

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेंतर्गत केंद्र सरकारने 18 पारंपारिक व्यवसायांचा समावेश केला आहे.  मासेमारीचे जाळे विणणारे, शिंपी, परीट (धोबी ), फुलांचे हार बनवणारे ,न्हावी , पारंपरिक बाहुल्या आणि खेळणी बनवणारे, टोपल्या/चटया /झाडू बनवणारे / काथ्यापासून वस्तू बनवणारे, कुंभार, चांभार, शिल्पकार, पाथरवट (दगड फोडणारे), कुंभार, सोनार, कुलूप, हातोडी आणि टूलकिट बनवणारे, लोहार, सुतार, होडी बनवणारे इत्यादींचा समावेश आहे. लघुउद्योग आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या विकासामध्ये होड्या आणि बनवणाऱ्यांची  भूमिका महत्वपूर्ण असून  ते आपल्या  मासेमारी उद्योगाच्या सुरळीत कामकाजात मोठी भूमिका बजावतात आणि भारतीय सागरी मत्स्यव्यवसायाचा  कणा म्हणून काम करतात. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय हे पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे नोडल मंत्रालय आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

[ad_2]

Related posts