PM Narendra Modi Address Lok Sabha Reminisce In The Old Parliament Building Modi In Parliament Special Session

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : आजपासून सुरु झालेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनाची (Parliament Special Session) सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या भाषणाने झाली. आज जुन्या संसद भवनामध्ये (Old Parliament Building) शेवटचं कामकाज पार पडणार आहे. 75 वर्षांपासून विविध घटनांचा साक्षीदार असलेल्या संसद भवनाला निरोद देताना पंतप्रधान मोदी भावूक झाले. पंतप्रधान मोदी यांनी जुन्या संसद भवनाच्या इमारतीतील आठवणींना उजाळा दिला. पहिल्यांदा संसदेत आलो तेव्हा नतमस्तक झालो, असं यावेळी पंतप्रधान यांनी सांगितलं.

संसदेच्या 75 वर्षांच्या प्रवासाचं स्मरण

पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, नवीन संसद भवनात जाण्यापूर्वी देशाच्या संसदेच्या 75 वर्षांच्या प्रवासाचे स्मरण करूया. या ऐतिहासिक वास्तूला आपण सर्वजण निरोप देत आहोत. यामध्ये देशवासीयांचा घाम गाळला गेला आहे. जुने संसद भवन येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देईल. जुन्या संसदेच्या इमारतीमध्ये आज शेवटचं कामकाज होणार आहे. आज पंतप्रधान मोदी (PM Modi in Lok Sabha) यांनी विशेष अधिवेशनात जुन्या संसद भवनाच्या इमारतीतील प्रवास पुन्हा नव्याने सर्वांसमोर मांडला.

75 वर्षांत 600 हून अधिक महिला खासदारांचं योगदान

जुन्या संसदेमध्ये कलम 370 हटवण्यासारखे अनेक महत्त्वाचे निर्णय या संसदेत घेण्यात आले. मागील 75 वर्षांत 600 हून अधिक महिला खासदारांनी संसदेत योगदान दिलं आहे. जुनं संसद भवन अनेक ऐतिहासिक घटनाचा साक्षीदार असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

नव्या संसदेसाठी देशातील नागरिकांचं योगदान : मोदी

पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, नवीन संसद भवनात जाण्यापूर्वी देशाच्या संसदेच्या 75 वर्षांच्या प्रवासाची आठवण करुया. जुने संसद भवन येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देईल. या ऐतिहासिक वास्तूला आपण सर्वजण निरोप देत आहोत. यामध्ये देशवासीयांचा घाम गाळला गेला आहे. नव्या संसदेच्या इमारतीसाठी देशातील नागरिकांच्या मेहनतीचं योगदान आहे.

जी-20 चं यश हे संपूर्ण देशाचं यश 

संसदेचे विशेष अधिवेशनात लोकसभेत पंतप्रधान मोदी म्हणतात, “आज सर्वत्र जी20 च्या यशाचं कौतुक केलं आहे. मी त्यासाठी सर्वांचे आभार मानतो. G20 चं यश हे देशातील 140 कोटी नागरिकांचं यश आहे. हे एखाद्या व्यक्तीचा किंवा पक्षाचं नाही तर, भारताचं यश आहे. हे आपल्या सर्वांचं यश आहे.”

 



[ad_2]

Related posts