Train Cancelled Due To Heavy Rain 19 Mail Express Hit By Rain On Western Railway Line Know Full List

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील (Western Railway Route) अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द (Train Cancelled) करण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेवरील एक्सप्रेस वाहतूक विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या रतलाम विभागात तीव्र मुसळधार कोसळलेल्या तीव्र पावसामुळे मुंबई सेंट्रलहून दिल्ली, गुजरात, राजस्थानसाठी धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकांवर मोठा परिणाम झाला आहे. मुंबई सेंट्रल ते हजरत निजामुद्दीन ऑगस्ट क्रांती तेजस राजधानी एक्स्प्रेससह एकूण 19 रेल्वेगाड्यांच्या खोळंबा झाला आहे. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

गोध्रा रेल्वे स्थानकावर रेल्वे रुळावर पाणी

गोध्रामध्ये पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. गोध्रा रेल्वे स्थानकावर रेल्वे रुळावर पाणी साचलं असून पाण्याची पातळी सतत वाढताना दिसत आहे. यामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. मुंबई ते दिल्ली दरम्यानच्या रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे. इंदूर दोंड अवंतिका एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. राजधानीसह अवध पश्चिम सुवर्ण मंदिर जम्मू तावी एक्सप्रेस ट्रेनचा मार्ग बदलण्यात आला आहे. गोध्रा रेल्वे स्थानकावर रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रवासी अडकून पडले होते. मुंबई आणि दिल्ली दरम्यानच्या ट्रॅकवर पाणी साचल्याने राजधानीसह पॅसेंजर गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहे. तर, काही लोकल मेमू गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम

मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्गिकांवरून पाणी वाहत असल्याने नियोजित मार्गांवरील रेल्वेगाड्या पश्चिम रेल्वेने भोपाळ-इटारसी-खंडवामार्गे वळविण्याचा निर्णय घेतला. काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या असून काही रेल्वेगाड्या विलंबाने धावत आहेत. यामुळे गणेशोत्सवानिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. गाडी क्रमांक 12953 मुंबई सेंट्रल-हजरत निजामुद्दीन रविवारी सायंकाळी 5.10 वाजता सुटणार होती.

पावसामुळे सात तास विलंबाने रविवारी मध्यरात्री 12.30 वाजता रवाना करण्यात आली. गाडी क्रमांक 12961 मुंबई सेंट्रल – इंदूर-मुंबई सेंट्रल अवंतिका एक्स्प्रेस, इंदूर-दौंड- इंदूर एक्स्प्रेस, नागदा-रतलाम विशेष रतलाम – उज्जैन विशेष, दाहोद- रतलाम- दाहोद विशेष, रतलाम-नागदा विशेष या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 12939 पुणे-जयपूर जेसीओ ही गाडी 17 सप्टेंबर रोजी भेस्तान-जळगाव – भुसावळ – इटारसी – भोपाळ – संत हिरदरम नगर नगडा या मार्गावर वळवण्यात आली आहे. 

भरुच – अंकलेश्वर वडोदरा विभागादरम्यान पुल क्रमांक 502 वर धोक्याचे चिन्ह असलेल्या पाण्याच्या पातळीमुळे 18 सप्टेंबर रोजी काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या गाड्यांची यादी पाहा.

  1. 22930 वडोदरा-डहाणू रोड जेसीओ रद्द
  2. 22929 डहाणू रोड- वडोदरा जेसीओ रद्द
  3. 09156 वडोदरा सुरत जेसीओ रद्द
  4. 09155 सुरत – वडोदरा जेसीओ रद्द
  5. 09318 आनंद वडोदरा जेसीओ रद्द
  6. 22953 मुंबई -अहमदाबाद जेसीओ रद्द
  7. 22954 अहमदाबाद – मुंबई जेसीओ रद्द
  8. 20901 मुंबई-गांधीनगर वंदे भारत जेसीओ रद्द
  9. 20902 गांधीनगर-मुंबई वंदे भारत जेसीओ रद्द
  10. 12009 मुंबई – अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेस I जेसीओ रद्द
  11. 12010 अहमदाबाद – मुंबई जेसीओ रद्द
  12. 19015 दादर – पोरबंदर जेसीओ रद्द
  13. 12925 बांद्रा टी-अमृतसर जेसीओ रद्द
  14. 12931 मुंबई-अहमदाबाद जेसीओ रद्द
  15. 12932 अहमदाबाद – मुंबई जेसीओ रद्द
  16. 12933 मुंबई – अहमदाबाद जेसीओ रद्द
  17. 12934 अहमदाबाद -मुंबई जेसीओ रद्द
  18. 82902 अहमदाबाद-मुंबई तेजस एक्सप्रेस जेसीओ रद्द
  19. 82901 मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस जेसीओ रद्द
  20. 12471 बांद्रा टर्मिनस-श्री मारा वैष्णोदेवी कटरा स्वराज एक्सप्रेस जेसीओ रद्द
  21. 09172 भरुच-सुरत जेसीओ रद्द
  22. 04711 बिकानेर-बांद्रात जेसीओ रद्द

 

[ad_2]

Related posts