The Nun 2 Prank In Movie Theater Nun Ghost Found Standing At Exit Gate Watch Viral Video

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

The Nun 2: शाहरुखच्या जवान (Jawan) या चित्रपटासोबतच ‘द नन 2’ हा भुताचा चित्रपट (Horror Movie) देखील 7 सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलिज झाला. ‘द नन 2’ हा 2018 च्या ‘द नन’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. हा चित्रपट (Movie) जागतिक स्तरावर प्रचंड कमाई करत आहे. मात्र, भारतात किंग खानच्या ‘जवान’ या चित्रपटामुळे या चित्रपटाला काही फारसा प्रतिसाद मिळू शकला नाही. पण तरीही The Nun 2 ने 11 दिवसांत भारतात 31 कोटींची कमाई केली आहे. दररोज मोठ्या संख्येने लोक ‘नन 2’ पाहण्यासाठी जात आहेत. सध्या सोशल मीडियावर याच चित्रपटासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोकांना ‘नन 2’ चित्रपट संपल्यानंतर खऱ्याखुऱ्या भुताचं दर्शन झालं आणि लोक भयभीत झाले, त्यांची एकच तारांबळ उडाली.

नेमकं काय घडलं?

सध्या ‘द नन 2’ चित्रपटानंतर घडलेला एक किस्सा चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे नेटकरी नाही तीच मज्जा घेत आहेत. त्याचं झालं असं की, ‘द नन 2’ चित्रपट पाहिल्यानंतर लोक सिनेमागृहाच्या (Theater) एक्झिट गेटमधून बाहेर पडत होते, तितक्यात अचानक एक्झिट गेटच्या कोपऱ्यात त्यांना खऱ्या भूतनीचं दर्शन झालं आणि एकच खळबळ उडाली. एक्झिट गेटच्या दिशेने येताच लोकांनी भूताला पाहिलं आणि ते घाबरले. यानंतर उरलेल्या मागच्या लोकांना गेटमधून बाहेर निघायचं धाडस होईना. काही तर भूताला बघताच पायऱ्या चढत मागे फिरले आणि काही असेही नग होते, ज्यांनी भुताकडे लक्षही दिलं नाही आणि निमूटपणे गेटमधून बाहेर पडले.

एक्झिट गेटजवळ उभी होती ‘नन’

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसतं की, एका व्यक्तीने ननचा पोशाख परिधान करून चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या लोकांची खिल्ली उडवली आहे. भूताचा ड्रेस घालून तो एक्झिट गेटजवळ शांतपणे उभा आहे आणि लोक निघताना त्यांच्याकडे पाहत आहे. जेव्हा काही लोकांनी त्या व्यक्तीला ननच्या वेशभूषेत पाहिलं, तेव्हा त्यांनी त्याला नन समजलं. त्यांना वाटलं की, खरोखरच नन चित्रपटातील भूत अवतरलं आहे. आपली मज्जा घेतली जात आहे हे माहीत असूनही अनेक लोक घाबरले, कारण ते नुकताच भुताचा चित्रपट पाहून आले होते. तर अनेकजण भुताला पाहून हसतानाही दिसले.


नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रियाही येत आहेत. एका यूजरने म्हटलं की, ‘मी तिथे असतो तर त्या भुतासोबत सेल्फी घेतली असती.’ तर दुसरा नेटकरी म्हणतो, ‘कल्पना करा की तो भूत थिएटरमध्ये तुमच्या मागे धावू लागला.’ आणखी एका युजरने म्हटलं की, ‘हा संपूर्ण चित्रपटातील भुतापेक्षा चांगला आहे.’

हेही वाचा:

‘बादल बरसा बिजुली…’ गाण्यावर शाळेतील मुलाचे अफलातून ठुमके; नेटिझन्स प्रेमात, पाहा व्हिडीओ



[ad_2]

Related posts