The burning pyre, मित्राची चिता जळू लागली, त्याने केले धक्कादायक कृत्य, अंत्यसंस्काराला उपस्थित लोक हादरले – a young man suffered 90 percent burns after falling on a friends burning pyre

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील फिरोझाबाद येथे एक सुन्न करणारी घटना घडली आहे. येथे एका युवकाचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्काराच्या वेळी त्याच्या मित्राने त्याच्या जळत्या चितेवर उडी घेतली. यात हा मित्र भाजला आहे. ही घटना नगला खंडर परिसरातील माडई या गावातील आहे. ३२ वर्षीय हा तरूण कर्करोगाने पीडित होता. शनिवारी सकाळी ६ वाजता त्याचा मृत्यू झाला.या तरुणाच्या पार्थिवावार अत्यसंस्कार करण्यात येत होते. त्यावेळी त्याचा मित्र आनंद जादौन हा चक्कर आल्यान चितेवर पडला. यात तो ९० टक्के भाजला. या घटनेमुळे उपस्थित जनसमुदायामध्ये एकच कल्लोळ उडाला. प्रचंड गोंधळ उडाला. या घटनेनंतर या तरुणाला ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला आग्रा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात पाठविण्यात आले.

मुरूडचा जंजिरा किल्ला पाहायला जाताय?; मग ही बातमी वाचाच, प्रशासनाने घेतला हा निर्णय
या घटनेबाबत माहिती देताना मृत अशोक याच्या भाच्याने सांगितले की, अशोकची चिता जळत होती. तेव्हा अचानक आनंदला चक्कर आली आणि तो चितेवर पडला. जळत्या चितेवर पडल्याने आनंद ९० टक्के भाजला आहे. आनंदला तीन मुली आहेत. आनंद हा आपला मित्र अशोक याच्या अंत्यसंस्कारासाठी आला होता.

बैलगाडा मालकाचा नादच खुळा; चक्क फॉर्च्युनर गाडीतून आणली घोडी, लोक बघतच राहिले, पाहा व्हिडिओ
गावकरी म्हणतात, ‘तरुणाने चितेवर उडी घेतली’

मात्र, या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये मात्र वेगळीच चर्चा ऐकायला मिळत आहे. आनंदला आपला मित्र अशोक याच्या मृत्यूने मोठे दु:ख झाले होते. या दु:खामुळेच या तरुणाने अशोकच्या जळत्या चितेत उडी घेतली, असे या अंत्यसंस्काराला उपस्थित गावकरी म्हणत आहेत. मात्र ही गोष्ट हे गावकरी कॅमेऱ्यापुढे बोलण्यास मात्र तयार नाहीत.

Gautami Patil: आडनाव लवकर बदलून घे, मराठा संघटनांचा इशारा; गौतमी पाटीलने ठणकावूनच सांगितलं, म्हणाली…
या घटनेबाबत माहिती देताना महेश नावाच्या एका गावकऱ्याने सांगितले की, अशोक हा कर्करोगाने पीडित होता. अंत्यसंस्काराच्या वेळी चिता जळू लागल्यावर तेथून लोक मागे येऊ लागले आणि त्याच वेळी ही घटना घडली.

[ad_2]

Related posts