[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
नवी दिल्ली : भारतीय हवामान खात्याकडून शुक्रवारी मान्सून २०२३ संदर्भात महत्त्वाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदाचा मान्सून हा सामान्य राहील, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तर यावेळी जून ते सप्टेंबर या चार महिन्यामध्ये ९६ टक्के पाऊस अपेक्षित आहे. या दरम्यान, देशात ८७ सेमी पाऊस पडतो. तर ९६ ते १०४ टक्के झालेला मान्सून हा सामान्य मानला जातो. खंरतर, यंदा देशावर एल निनोचं संकट असणार आहे. पण हा धोका असला तरी नैऋत्य मान्सून भारतात सामान्य राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.हवामान खात्यानुसार, एल निनोमध्ये विषुववृत्तीय प्रशांत महासागराचा पृष्ठभाग गरम होतो आणि त्यामुळे मान्सून कमकुवत होतो. यावेळी ९० टक्क्यांहून अधिक एल निनोचा धोका जाणवणार आहे. यामुळे याचा मोठा परिणाम पावसावर आणि प्रामुख्याने शेतीवर पाहायला मिळेल.
भारतात जूनमध्ये कसा असेल पाऊस…
भारतात जूनमध्ये कसा असेल पाऊस…
हवामान खात्याच्या पहिल्या अंदाजानुसार, देशातील बहुतांश भागामध्ये जून महिन्यात मान्सून सामान्यपेक्षा कमी असेल. यामुळे जून महिन्यातही उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. वायव्य भारतातही सामान्यपेक्षा मान्सून कमी असेल. अशात दक्षिण द्वीपकल्पीय भारत, उत्तर भारत आणि ईशान्येकडील भागांमध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे. त्यामुळे या भागातील तापमानही सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
खरंतर, केरळमध्ये मान्सून सुरू होण्याची सामान्य तारीख १ जून आहे. गेल्या वर्षी हाच मान्सून २९ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. पण यावेळी मान्सून ४ जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
[ad_2]