बिश्नोई गँगनंच कॅनडात केली सुक्खाची हत्या; फेसबुक पोस्ट करत स्विकारली जबाबदारी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Lawrence Bishnoi Gang Murdered Sukhdol Singh: खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरच्या हत्येवरुन कॅनडा आणि भारत यांच्यातील तणाव वाढला आहे. अशातच पंजाबमधील फरार गँगस्टर सुखदूल सिंह उर्फ सुक्खा दुनुके याची कॅनडात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं संपूर्ण जगभरात खळबळ माजली आहे. अशातच आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, लॉरेन्स बिश्नोई गँगनं कॅनडातील पिनीपेग सिटीमध्ये भारतातील फरार गँगस्टर सुखदूल सिंह उर्फ सुक्खा दुनुकेच्या हत्येची जबाबदारी स्विकारली आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या एका फेसबुक प्रोफाईलवरुन पोस्ट करत कॅनडातील गँगस्टर सुक्खा दुनुकेच्या हत्येची जबाबदारी स्विकारली आहे. तुम्ही पाहिजे तिकडे पळून जा, तुम्हाला तुमच्या पापांची शिक्षा नक्कीच मिळेल, असं म्हणत लॉरेन्स बिश्नोई फेसबुक पोस्टमधून इतर गँगस्टर्सनाही धमकी दिली आहे. 

[ad_2]

Related posts