[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>खलिस्तानी अतिरेक्यांना पाठीशी घालणाऱ्या कॅनडा सरकारला भारत सरकारनं चांगलाच दणका दिला आहे. पुढील सूचनेपर्यंत कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देणं भारत सरकारनं बंद केलं आहे. दोन दिवसांपूर्वी कॅनडानं भारताच्या एका राजनैतिक अधिकाऱ्याला मायदेशी परतण्याचे आदेश दिले होते. गुप्तचर विभागात काम करणाऱ्या या अधिकाऱ्याचं नाव देखील कॅनडानं जाहीर केलं. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये अशा अधिकाऱ्यांचं नाव जाहीर करणं निषिद्ध मानलं जातं. तरीही, जस्टीन त्रुदो यांच्या सरकारनं हा पोरकटपणा केला, त्याला आता भारत सरकारनं सडेतोड उत्तर दिलं आहे. </p>
[ad_2]