Monsoon Withdrawal To Be 26th September From North India Says Research Scientist Akshay Deoras Maharashtra Weather Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: देशातून नैऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास 26 सप्टेंबरपासून होण्याची शक्यता वर्तवण्यात येणार आहे. सप्टेंबरच्या शेवटापर्यंत उत्तर भारतातील बऱ्याच भागातून मान्सून परतण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. तर सप्टेंबरला संध्याकाळनंतर वादळी पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान शास्त्रज्ञ डॉ. अक्षय देवरस यांनी दिलीय.  

17 सप्टेंबरला राजस्थानच्या पश्चिम भागातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो. त्यानंतर 5 ऑक्टोंबरच्या आसपास मान्सून महाराष्ट्राच्या उत्तर भागातून परत जातो. उर्वरित राज्यातून जाण्यासाठी पाच ते दहा दिवस लागतात. 10 ऑक्टोबरपर्यंत मान्सून राज्यातील बऱ्याच  परत गेलेला असतो. 1975 ते 2022 या कालावधीत  आतापर्यंत मान्सून परतीच्या तारखांवर नजर मारल्यास लक्षात येईल की, 2005 साली 2 सप्टेंबरला मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. त्यानतंर 2007 साली 30 सप्टेंबरला परतीचा प्रवास सुरू झाला होता. म्हणजे मान्सूनच्या आगमनाच्या तारखांपेक्षा मान्सूनच्या परतीच्या तारखांमध्ये विविधता दिसून येते

मान्सून परतीचा प्रवास नेमका काय?

जून  ते सप्टेंबर या कालावधीत जेव्हा भारतात मान्सून सक्रिय असतो तेव्हा आपल्याला दोन प्रकारच्या वाऱ्यांमध्ये युद्ध पाहायला मिळते. पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराणमध्ये कोरडी हवा असते. तर याउलट बंगालचा उपसागर, अरबी समुद्र किनारपट्टी भागातील हवेत आद्रता असते. भारतावर या दोन वाऱ्यांमध्ये युद्ध सुरू असते त्यामध्ये कोणते वारे हे अधिक शक्तिशाली आणि प्रभावी आहे त्यावर मान्सून कसा असणार हे निश्चित होते. याचे उदाहरण द्याचे झाले तर ऑगस्ट 2023 मध्ये जो पाऊस पडला तो 1901 पासूनच्या ऑगस्ट महिन्यातील पावसाचा विचार करता सर्वात कमी पाऊस या वर्शी पाहायला मिळाला. दोन पावसाचे खंड ऑगस्टमध्ये पाहायला मिळाले.  पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराणमध्ये मोठ्या प्रमाणात कोरडी हवा भारतात आली होते. परिणामी या वाऱ्याचा परिणाम पावसावर झाला. 15 सप्टेंबर किंवा शेवटच्आ आठवडा पाहिला तर मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग मंदावतो. ज्यामुळे कोरडी हवा भारतात येते. जशी कोरडी हवा भारतात येते तसा मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो.  

राज्यात तूट कायम राहण्याची शक्यता

सध्याची स्थिती पाहिली तर मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झालेला नाही. परतीचा प्रवास कधी सुरू होईल याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. परंतु हवामानाची स्थिती पाहता देशातून नैऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास 26 सप्टेंबरपासून होण्याची शक्यता  आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर 5 ऑक्टोबरनंतर परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटी राज्यात वादळी पावसाचा अंदाड वर्तवण्यात आला असला तरी पाण्याची तूट भरून निघणं अशक्यच आहे. यंदा राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यात पेरण्याही झाल्या नसल्यानं शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. सध्या पिण्याच्या पाण्यासह, चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे. अशा या भीषण परिस्थितीत 5 ऑक्टोबरपर्यंत पाऊस होणार असल्यानं शेतकरी चिंतेत आहे. पावसाच्या सरासरीत अजूनही तूट असल्यानं  ही मोठी तूट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापुढे सरकारला दुष्काळी परिस्थितीसोबत लढण्यासाठी तयार राहावं लागणार आहे. 

हे ही वाचा :

Maharashra Drought : दुष्काळाची टांगती तलवार; राज्यातील 13 जिल्हे रेड झोनमध्ये, मराठवाड्यातील आठपैकी 6 जिल्ह्यांचा समावेश

[ad_2]

Related posts