Seema Haider Sachin Love Story Pakistani Man Got Angry On Seema Haider Choice Video Viral From Asia Cup 2023

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Seema Haider Love Story: सीमा हैदर (Seema Haider) पाकिस्तान सोडून भारतात आल्यापासून ती सतत चर्चेत आहे. सीमा पब्जी खेळताना सचिन मीना (Sachin Meena) याच्या प्रेमात पडली आणि त्याच्यासाठी ती पाकिस्तान सोडून भारतात आली. सीमा आणि तिचा पती सचिन सोशल मीडियावर बरेच लोकप्रिय झाले आहेत. भारतीय लोकांनी या जोडप्याला जितकं प्रेम दिलं आहे, तितकंच त्यांना ट्रोल देखील केलं आहे. सचिनचे स्वतःचे शेजारीही या दोघांबद्दल खूप काही बोलले आहेत.

इतकं सगळं असूनही सीमा आणि सचिन दोघेही एकमेकांसोबत आनंदाने राहत आहेत. सीमा भारतात येऊन आता बराच काळ लोटला आहे. पण तरीही लोक तिला एक प्रश्न विचारायचे थांबलेले नाहीत आणि तो म्हणजे “तिने सचिनमध्ये असं काय पाहिलं?”

भारतासह पाकिस्तानातूनही प्रश्न उपस्थित

सीमाला सचिनबद्दल हा प्रश्न केवळ भारतीयांनीच विचारला नाही, तर पाकिस्तानातील काही लोकांनीही सीमासमोर हा प्रश्न उपस्थित केला आहे. सीमाने याआधी अनेकवेळा सांगितलं आहे की, तिचं सचिनवर खूप प्रेम आहे आणि याच प्रेमामुळे तिने भारतात येण्याचा निर्णय घेतला. तरीही पुन्हा-पुन्हा तिला तोच प्रश्न विचारला जातो. यातच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषकादरम्यानचा (Asia Cup 2023) असल्याचं सांगण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये एक पाकिस्तानी व्यक्ती बाजूला बसलेल्या भारतीय महिलेला प्रश्न विचारताना दिसत आहे.

पाकिस्तानी व्यक्तीने विचारलं – सचिनमध्ये असं काय पाहिलं?

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी व्यक्ती भारतीय महिलेला विचारताना दिसत आहे की, “भारतात सौंदर्य आणि तरुणांची एतकी काय कमी होती की, सीमाला आवडून आवडून फक्त सचिनच आवडला?” त्याने पुढे विचारलं की, “सीमाने सचिनमध्ये असं काय पाहिलं? सचिनमध्ये इतकं काय आहे?”

सीमाला असे प्रश्न विचारणारी ही पहिली व्यक्ती नाही. याआधीही सीमाच्या निवडीवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, सीमाला आता या सर्व गोष्टींची सवय झाली आहे. तिला लोकांच्या सतत विचारण्याचा त्रास होत नाही. आता ती सचिन आणि तिच्या 4 मुलांसोबत आनंदाने जीवन जगत आहे. सीमाने भारतीय संस्कृतीचाही पूर्णपणे स्वीकार केला आहे. भारतात साजरा होणारा प्रत्येक सण देखील ती आनंदाने साजरा करते.

हेही वाचा:

कार्टून कॅरेक्टरच्या इतका प्रेमात पडला की लाखो रुपये खर्चून ‘डॉल’शी केलं लग्न; नेमकं असं करण्यामागचं कारण काय?



[ad_2]

Related posts