Agriculture News Cardamom Farming Farmers Can Become Richer By Cultivating Cardamom 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Cardamom Farming : शेतकरी (Farmers) वेगवेगळ्या पिकांची लागवड करुन भरघोस उत्पन्न मिळवत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकरी कमी खर्चात चांगलं उत्पादन मिळवत आहेत. वेलची किंवा इलायचीची शेती (Cardamom Farming) देखील अशीच आहे. या शेतीतून शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळू शकते. प्रत्येकाच्या घरात विविध प्रकारचे मसाले वापरले जातात. त्यामध्ये हमखास असणारा पदार्थ म्हणजे वेलची. वेलची लागवडीची प्रकिया नेमकी काय ते पाहुयात. 

या प्रमुख राज्यांमध्ये वेलचीची लागवड

वेलची ही सुगंधी असते. प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात वेलची वापरली जाते. मसाल्यांमध्ये वेलचीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अन्न सुगंधित करण्यासोबतच शेतकरी बांधवांना वेलची शेतीतून चांगला नफाही मिळतो. देशात वेलचीची लागवड ही प्रामुख्यानं महाराष्ट्र, कोकण, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये केली जाते.

नारळ आणि सुपारीच्या बागांमध्ये वेलचीची लागवड 

सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी वेलचीची लागवड ही नारळ आणि सुपारीच्या बागांमध्ये केली जाते. वेलचीच्या लागवडीला जास्त पाऊस किंवा अति उष्णता लागत नाही. त्याऐवजी, पावसाळ्यातील ओलावा आणि आर्द्रता यांच्यामध्ये तुमच्या नवीन बागा तयार करुन तुम्ही चांगले उत्पादन मिळवू शकता.

वेलची लागवड करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

वेलची लागवडीसाठी किमान 10 अंश सेल्सिअस आणि कमाल 35 अंश सेल्सिअस तापमान असावे लागते अशी माहिती कृषी तज्ज्ञांनी दिली आहे. अरेका आणि नारळाची झाडे 3×3 मीटर अंतरावर लावली जातात आणि प्रत्येक दोन झाडांमध्ये वेलचीचे एक झाड लावले जाते. वेलचीची झाडे जास्त पाणी सहन करु शकत नाहीत. माती फक्त ओलसर ठेवली पाहिजे. सुपीक जमिनीत वेलचीची लागवड केल्यावर दर चार दिवसांनी पाणी द्यावे. सेंद्रिय पद्धतीनं वेलची लागवड करणं नक्कीच फायदेशीर आहे. अशा परिस्थितीत बागेला सेंद्रिय पद्धतीने पोषण पुरवठा करावा.

पूर्ण वाढ झाल्यानंतर वेलचीचा रंग हिरवा होतो

वेलचीची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्याचा रंग हिरवा आणि पिवळसर होतो. त्यानंतर वेलची देठासह कात्रीने कापली जाते. पावसाळ्यात वेलची तयार करणं अवघड असते. फळे सुकत नाहीत.

वेलचीचे आरोग्यदायी फायदे

चहाची चव वाढावी किंवा माऊथ फ्रेशनर म्हणून वेलचीचा वापर केला जातो. पण या छोट्याशा वेलचीचे तसे बरेच फायदे आहेत. पचनासंबंधी समस्या असल्यास वेलचीचं सेवन केलं जातं. पोटात जळजळ अथवा उलटी होत असल्यास वेलचीचं सेवन केलं जातं. त्यामुळेच जेवणानंतर वेलची खाण्यासाठी दिली जाते. त्याचप्रमाणे माऊथ फ्रेशनर म्हणूनही वेलचीचा वापर केला जातो. तसंच अॅसिडीटीवरही वेलची फारच उपायकारक आहे. वेलचीमध्ये असणाऱ्या रासायनिक गुणांमुळे फायदा होतो. वेलचीमुळे शरीरात उर्जा प्राप्त होते. त्यामुळेच वेलची सेवन करणं चांगलं मानलं जातं. घसा दुखणं किंवा खवखव असल्यास वेलचीच्या सेवनानं नक्कीच आराम मिळतो. 

महत्त्वाच्या बातम्या:

छोट्याशा वेलचीचे मोठे फायदे… अनेक गोष्टींवर उपायकारक

[ad_2]

Related posts