Youth Die In Fire Due To Short Circuit In Ganpati Decoration Lights At Khed Pune Maharashtra

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

खेड, पुणे :  गणपतीचा उत्साह (Ganeshotsav) प्रत्येक गावागावात मोठ्या उत्साहात सुरू आहे. प्रत्येकाने आपल्याला घरात आपल्याला परीने डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातच खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातच शॉर्ट सर्किट (Fire) झाल्याने झोपेतच तरुणाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण खेड तालुका हादरला आहे. ऐन गणेशोत्सवात हा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे. 

वैभव जगन्नाथ गरुड ( वय 35)  जळून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत खेड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील  खरापुडी बुद्रुक येथील दत्तनगर येथे  वैभव गरुड हे त्यांच्या कुटुंबासमवेत राहतात.  गरुड यांनी त्यांच्या घरातील गणपती बाप्पा समोर  आकर्षक सजावट करत लाईटच्या माळा लावल्या होत्या. मात्र मध्यरात्री घरात शॉर्ट सर्किट झाले आणि घरात आग लागली. त्यामुळे घरातील सर्व साहित्य त्यात साड्या, बेड आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या.  मात्र या आगीत गादीवर झोपलेले वैभव यांचा जागेवरच जागेवरच जळून मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. 

वैभव गरड हा परिसरात सर्पमित्र म्हणून परिचित होता. त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुली असा परिवाल आहेत. घरातील कर्ता पुरुष अचानक गेल्याने पत्नीला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.  ही घटना वाऱ्यासारखी परिसरात पसरली. या घटनेने परिसरात अनेकजणांना धक्का बसला आहे. वैभव याचा अचानक झालेल्या दु्र्देवी मृत्यूने त्याच्या मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे. या घटनेने ग्रामस्थामधून हळहळ व्यक्त होत आहे. 

मारहाण करणाऱ्या पतीला भीती दाखवण्यासाठी अंगावर पेट्रोल ओतलं अन् पतीनं थेट…

दारुच्या नशेत मारहाण करणाऱ्या (Pune Crime News) पतीला भीती दाखविण्यासाठी अंगावर पेट्रोल ओतून घेतलेल्या महिलेला पतीने पेटवून दिल्याची घटना लोणी काळभोर परिसरात घडली. यात महिला गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पती अक्षय मारुती कुंजीर आणि सासू आशा मारुती कुंजीर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अमृता आणि अक्षय कुंजीर यांचे 2020 मध्ये लग्न झाले आहे. अक्षय दारू पिऊन पत्नीला मारहाण करीत होता. अक्षयने 12 सप्टेंबरला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दारुच्या नशेत घरातील सामानाची तोडफोड केली. त्यानंतर पत्नीला घरातून निघून जा,असे सांगितले. त्यावर पत्नीने छळास कंटाळून मी मरुन जाते, असे म्हणत घरात शेतीपंपासाठी आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेतले. त्यावेळी पतीने काडीपेटीने आग लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यात अमृता गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर सासू आशा कुंजीर यांनी हा प्रकार कोणाला सांगू नको, असे म्हणत सुनेला दमदाटी केली म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

[ad_2]

Related posts