[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
kharif sowing season : यावर्षीच्या खरीप हंगामात (kharif sowing season) भाताच्या लागवडीत वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा भात लागवडीत तीन टक्क्यांची वाढ झाली आहे. यंदा 411.52 लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 400.72 लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली होती. तर कडधान्याच्या लागवडीत पाच टक्क्यांची घट झाली असल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे.
122.57 लाख हेक्टर क्षेत्रावर कडधान्याची लागवड
कृषी मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार, चालू खरीप पेरणीच्या हंगामात भात पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र तीन टक्क्यांनी वाढले आहे. यावर्षी 411.52 लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड झाली आहे. तर कडधान्य क्षेत्रामध्ये पाच टक्क्यांची घट झाली आहे. यावर्षी कडधान्याखालील क्षेत्रात पाच टक्क्यांची घट झाली असून 122.57 लाख हेक्टर क्षेत्रावर गेलं आहे. जे मागील वर्षी 128.49 लाख मेट्रीक टन होते. भरड तृणधान्यांचे लागवडीत थोडी वाढ झाली आहे. भरड तृणधान्यांच्या लागवडीचे क्षेत्र हे 183.73 वरुन 186.07 लाख मेट्रीक टन झाले आहे.
तेलबियांच्या लागवडीतही घट
कृषीमंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, तेलबियांची लागवडीत घट झाली आहे. यावर्षी 192.91 लाख हेक्टर क्षेत्रावर तेलबियांची लागवड करण्यात आली आहे. मागील वर्षी याच कालावधीत 196.08 लाख हेक्टर क्षेत्रावर तेलबियांची लागवड करण्यात आली होती. भुईमुगाच्या लागवडीत देखील घट झाली आहे. यावर्षी 43.89 लाख हेक्टर क्षेत्रावर भुईमुगाची लागवड झाली होती. मागील वर्षी 45.51 लाख हेक्टर क्षेत्रावर भुईमुगाची लागवड करण्यात आली होती. सोयाबीनची 124.77 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड केली आहे. मागील वर्षी याच कालावधीत 125.59 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती.
कापसाखालील लागवडीचे क्षेत्रही घटले
कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार कापसाखालील लागवडीचे क्षेत्रही घटले आहे. यावर्षी 123.42 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत 127.57 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. ऊसाच्या लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. यावर्षी 59.91 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड झाली आहे. मागील वर्षी 55.66 लाख हेक्टर क्षेत्रावर ही लागवड करण्यात आली होती. दरम्यान, एकूण खरीपाच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. 1099.23 लाख हेक्टरवरुन लागवडीचे क्षेत्र हे 1102.99 लाख हेक्टरवर गेले आहे. खरीप पिकांची काढणी साधारणपणे ऑक्टोबरपासून सुरू होते.
महत्त्वाच्या बातम्या:
Agriculture news : कमी पावसाचा भात पिकावर परिणाम, तांदूळ उत्पादनात पाच टक्क्यांची घट होण्याची शक्यता; ‘या’ राज्यात परिणाम
[ad_2]